विवाह; ऐंशीचे दशक;

ऐंशीच्या दशकातील विवाह: आनंदोत्सव कि कारुण्यसोहळे

Submitted by atuldpatil on 9 July, 2018 - 05:25

म्ही भावंडे लहान होतो. मी दुसरी तिसरीला असेन. आईच्या माहेरी शेजारी एक अतिशय गरीब कुटुंब होते. अत्यंत हलाखीची स्थिती. त्यातच काही आजाराने कि कशाने त्या घरातला कर्ता पुरुष गेला आणि त्यांच्यावर जणू आभाळच कोसळले. मुले लहानच होती. पण आमच्यापेक्षा थोडी वयाने मोठी. मग आईने त्यातल्या एका मुलीला आपल्याकडेच ठेऊन घेऊन तिचे पालनपोषण करायचा विचार तिच्या आईला बोलून दाखवला. खरंतर आम्हालाच तुमच्या मुलीची मदत होईल. तेंव्हा आम्ही तुमच्यावर उपकार वगैरे करत आहोत अशी भावना तुम्ही मनात आणू नका. तिचा मी नीट सांभाळ करीन. असे माझ्या आईने त्या मुलीच्या आईला सांगितले.

Subscribe to RSS - विवाह; ऐंशीचे दशक;