एका संध्याकाळची डायरी

“ एका संध्याकाळची डायरी ”

Submitted by Charudutt Ramti... on 7 July, 2018 - 16:05

वेळ संध्याकाळची. दिवे लागणीची. काहीशी एकाकी, काहीशी कातरवेळ वगैरे म्हणतात तसली. बाल्कनी मधे बसलो होतो, एकटाच. स्वत:च्याच अस्तित्वाचे फरसाण खात. किती वेळ ते माहिती नाही. पण बराच वेळ. एक डोंगर आहे पश्चिमेला बाल्कनी मधून दिसणारा. त्या डोंगरा पलीकडे होणारा सूर्यास्त आमच्या बाल्कनी मधून दिसतो. अगदी दररोज. विशेषत: उत्तरायणात नक्कीच. पुर्वी दक्षिणायनातही दिसायचा, साधारण आठेक वर्षांपूर्वी इथे राहायला आलो तेंव्हा. आता ह्या वर्षीच्या संपत आलेल्या उत्तरायणाचे थोडेच काही दिवस शिल्लक उरलेत. मोजायचेच झाले तर फक्त अकरा दिवस. मग मात्र हळू हळू हा सूर्यास्त दिसायचा बंद होईल.

विषय: 
Subscribe to RSS - एका संध्याकाळची डायरी