तुझ्या परत येण्याने

तुझ्या परत येण्याने....

Submitted by आदीसिद्धी on 30 June, 2018 - 11:37

डोळ्यात अश्रू भरून आले
आठवणींनी मनात गर्दी केली
शब्दही गहिवरले
तु गेलास तेव्हा..

तो पहिला पाऊस
चिंब भिजवून गेला
तुझा पहिला स्पर्श
हलकीशी ओढ लावून गेला..

रोज रात्री झोपल्यावर
चेहेरा तुझा स्वप्नात येतो
येईन मी लवकरच
असं आश्वासन देऊन हसतो

खळी तुझ्या गालावरची
पुन्हा तुझ्या प्रेमात पाडते
ओठावरचं हसू तुझ्या
चांदण्याचा शिडकावा करते..

तुझा आवाज कानावर येताच
सकाळ माझी बहरून येते
प्रेमळ नजरेचा एकच कटाक्ष
न बोलताच सारं काही सांगतो...

विषय: 
Subscribe to RSS - तुझ्या परत येण्याने