मी घराचा दरवाज्या लावून घेतला ...........................

चिरुमाला (भाग ७)

Submitted by मिरिंडा on 22 June, 2018 - 04:20

मी घराचा दरवाजा लावून घेतला आणि वेळ पाहिली. आठ वाजत होते. कामगार आणि त्यांची कामे यामुळे दुपारी विश्रांती मिळाली नव्हती. रात्रीचा स्वैपाक तयार होता. बाहेर पावसाने गुधडा घालायला सुरुवात केली होती. बरोबरीने वीजही साथ देतअसल्याने एक प्रकारचा राक्षसीपणा वातावरणात पसरला होता. दिवाणावर बसण्यासाठी मी गेलो , तिथे मला उदीचे खडे आणि त्यांची रेव दिसली. त्यातले काही खडे उजेडात चमकत होते. पिवळसर तांबुस रंगाचे खडे मी गोळा केले . एका पेपरात गुंडाळून त्याची पुडी बनवली आणि ती समोरच्याच खुर्चीवर ठेवली मला अचानक फकिराची आठवण झाली. तो म्हणाला ते किती विरोधी होतं हे आठवलं.

Subscribe to RSS - मी  घराचा दरवाज्या लावून घेतला ...........................