वेडा फकीर

प्रेमच पटले नाही

Submitted by वेडा फकीर on 21 June, 2018 - 11:21

हात तुझा एकदा,हातात हवा होता
इशकाचा डाव जुना, पण घाव नवा होता
कोऱ्या काळजाचा, हा गुंता सुटला नाही
तू झाली दुसऱ्याची, मला प्रेमच "पटले" नाही
©कवी - वेडा फकीर

शब्दखुणा: 

तुला विसरताना

Submitted by वेडा फकीर on 21 June, 2018 - 11:20

किती पापण्या थांबल्या, सांग तुला पाहताना
एकटाच मी हरलो, तुला जिंकताना
आहे आनंदात मी आता, मला शोधताना
मी माझ्यामध्ये हरवतो, तुला विसरताना
©कवी - वेडा फकीर

शब्दखुणा: 

आनंद ओंजळी

Submitted by वेडा फकीर on 21 June, 2018 - 10:43

गंधावाचून आहे फुल,इथे कोणाला रुचले का ?
अन्न आहे नाही चव,इथे कोणाला पचले का ?

प्रीत त्यांनी खरी जळवली,देह गिळून खचले का ?
बऱ्याच झाल्या भूलथापा,अजुनही त्यांना सुचते का ?

पाऊस माझा सखा सोयरा,आता तोही सुकला का ?
नभात दाटुनी येते वीज,अश्रू सोबतीस बसला का ?

नको नको हे तुमचे लालच,असे म्हणुनी फसलात का ?
नकारघंटा ऐकू आली,आयुष्यावर रुसलात का ?

अरे किती रे करशील हाल जिवाचे,आनंद ओंजळी रुतला का ?
तूच म्हणाला हेच सुख ते,मग असा पळत तू सुटला का ?
©कवी - वेडा फकीर

शब्दखुणा: 

नशिब

Submitted by वेडा फकीर on 21 June, 2018 - 10:41

झुरल्या माझ्या या व्यथाना,हसून गेले "नशिब"
कष्ट करून हात पोळले,मन म्हणाले "नशिब"

अंतरीच्या या मळ्याला,गंध दिला "नशिब"
एक वेड्या चाहुलीला,फसवून गेले "नशिब"

वाट बघण्याची ही सवय,वाट लावून गेले "नशिब"
हातात होता घास माझा,त्यांनी पळवले "नशिब"

वेदनेचा हुंकार आला,अन बहिरे झाले "नशिब"
रक्ताचे मग सडेच पडले,उपचार नडला "नशिब"

कर्तृत्व हाती आपुल्या असते,नसते काही "नशिब"
ज्यांचे जळले अन मग कळले,ते म्हणाले "नशिब"
©कवी - वेडा फकीर

शब्दखुणा: 

रविवार

Submitted by वेडा फकीर on 21 June, 2018 - 10:34

आता फक्त रविवारची
वाट बघत जगायचं
शनिवार रात्री जागून
रविवारी हे नको,ते हवं
असं म्हणत झोपायचं
तुला माझ्या आठवणीत
घुसळ घुसळ घुसळायच
पुन्हा तू आलीस का सोबत ?
असं म्हणत अबोल व्हायचं...
तुझं मन माझ्यात
अविरत असच जळायच
तू जळाली खरी
मनात निखारा बनून कशाला उरायच ?
सुमित्रा आपलं नात ही रविवार सारख व्हायचं...
जस की वेळात वेळ काढून रविवार कधी हे "फक्त बघायचं"
©कवी - वेडा फकीर

शब्दखुणा: 

खेटर

Submitted by वेडा फकीर on 21 June, 2018 - 10:31

सुमित्रा
तू तुझ्या माझ्या नात्याला,आठवणींना
प्रेम,अपेक्षा,ईच्छा या सर्वांना
एक झोपेची गोळी देऊन टाक....
कित्येक वर्षे शरीर झोपतंय..पण "मन जाग आहे"
सकाळी उठून कुणी "एक झोपेची रात्र देत का ?"म्हणून विचारत
आठवणीच खेटर(जोडे किंवा चपला) घेत मागे मागे फिरत......
©कवी - वेडा फकीर

शब्दखुणा: 

आपलं

Submitted by वेडा फकीर on 21 June, 2018 - 10:29

तसं कोणीच नसत कोणाचं
सगळं म्हणायला आपलं असत
आज अपेक्षा असतात मनात
उद्या त्याचच जन्मभर ओझं असत
©चारोळी वेडा फकीर

शब्दखुणा: 

यार हो

Submitted by वेडा फकीर on 21 June, 2018 - 10:27

तसा भलताच चढतो रागाचा पारा
तू त्यातून पार हो

तसा काही खास नाही मी
एकटाच असतो यार हो

जगण्याला चढते नशा अहंकारी
भलतीच प्रसिद्धीची धार हो

मला नसते फाटकी झोळी खांद्यावरी
उरते फक्त कविता यार हो

तुला आठवताच कळते तुजविण नाही जगणे
ना जगण्याचे जुळते सार हो

तसा मी तुझ्यातला अथांग सागर
तुही आठवणींची वीज पिऊन यार हो

गुलाबी नव्हतेच दिवस कधी आपले
मृगजळाची बैसली एक तार हो

तसा फकीर स्वतःलाच आता
रोज रोजच म्हणतो "यार हो"
©कवी - वेडा फकीर

शब्दखुणा: 

वीज

Submitted by वेडा फकीर on 21 June, 2018 - 10:24

पाऊस कोसळतोय बाहेर
शक्यतो मी ढगांकडे पाहतच नाही
कोणी रडताना डोळ्यात का पाहायचं असत त्याच्या....?
वीज पाहिली की डोकच फिरत साल माझं......
"ती"वीज डोळ्यांना दिसते,ऐकता येते,अनुभवता ही येतेच की....
मग आपण फक्त ती वीज निघून गेल्यावर "ती"अशी होती
तशी नव्हती....लक्क्ख होती.....आवाजाचा दरारा .. प्रकाशमान सुंदर
काळजात गेली रे "ती"..........वीज
"तू"ही त्या विजेसारखीच निघालीस.....
थोड्या वेळ दिसली मग अनुभवली ऐकू ही आली
पण धरून नाही ठेवता आली
"ती"बहुतेक वीजच होती
©कवी - वेडा फकीर

शब्दखुणा: 

आभाळमाया

Submitted by वेडा फकीर on 21 June, 2018 - 10:20

कोणत्या क्षणी अडे
पाऊल उंबऱ्यात वळे
कोण एक वाट पाही
कोण एकटे जळें

कुणी कुशीत घेई
तान्हे मन ते रडे
अंगणी पहाट कोरी
कोण मनात झुरे

कोण देई रंग
या आसमंता निळे ?
पोटी घेऊनि खोल
आभाळ माया उरे
©कवी - वेडा फकीर

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - वेडा फकीर