आयुर्वेद

आयुर्वेदोक्त पंचकर्म

Submitted by तोषवी on 16 November, 2011 - 21:51

सध्या प्रसारमाध्यमातून आयुर्वेद आणि पंचकर्म याबाबत इतकी जाहीरातबाजी होत आहे की पुष्कळजणाना पंचकर्म करून घेण्याची इच्छा असते.ह्याला पंचकर्मानेच आराम वाटला म्हणून मलाही करायचय अस म्हणणारे ही भेटतात. पाचही कर्म करायची असतील तर किती वेळ लागेल असही काही विचारतात.
यासाठीच आता पंचकर्म म्हणजे काय , ते नेमके का, कधी, कशासाठी,कोणाला करतात ते पाहू.

पंचकर्म म्हणजे काय?
हा आयुर्वेदीय शोधन चिकित्सा प्रकार आहे.

आयुर्वेदात चिकित्सेचे महत्वाचे दोन प्रकार १)शमन आणि २) शोधन

फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध

Submitted by जागोमोहनप्यारे on 5 November, 2011 - 05:14

फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध :

यावर्षीच्या २०११ मधील एप्रिलमधील गुढी पाडव्याला आमचा 'पाडवा' झाला. म्हणजे मला अ‍ॅक्सिडेंट झाला आणि पाय मोडला. Proud डाव्या पायातील पटेला ( गुढग्याची वाटी) , टिबिया, फिब्युला, ( लेग बोन्स) आणि तळपायामधील एक लहान हाड एवढे सगळे मोडले. त्यानंतर ऑपरेशन झाले. प्लेट, मोळे, तारा.. काय काय बसवले. मग हळूहळू वॉकर, काठी घेऊन आणि आता तसेच चालायला लागलो.

तांब्या पितळेची भांडी आपण का वापरत होतो ?

Submitted by विवेक नाईक on 25 September, 2011 - 06:33

सर्वसाधारण पणे पुजेत तांब्याची भांडी वापरतात. ह्याला काही कारण आहे का ?

ह्या ले खा ला कारण वाचना त आलेला NATURE मधला लेख.

२००४-२००५ साली NATUREची एक टीम पिण्याच्या पाण्याच्या विकसनशील देशा च्या समस्या ह्या विषयाषवर संशोधन करण्या करता भारतात आली. त्यांनां भारतातील खेडेगावातील पाण्याची स्त्रोते विशाणु व
जिवाणुनी दुषीत आढळली. अर्थातच त्यांचा ईथे यायचा हेतु सफल झाला. त्याना हेच दाखवायचे होते कि भारता सारख्या देशात साधे पिण्याचे पाणी धड मिळत नाही. पण ईथे असा एक मुद्दा उपस्थित झाला होता ज्यास बगल
देता येणे शक्य नव्हते.

आपले सण, एक तंत्र आणि मंत्र.

Submitted by सत्यजित on 17 June, 2011 - 02:47

गेले काही दिवस बर्‍याच ठिकाणी, आपल्या संस्कृतीला लोक नाव ठेवताना दिसली. धर्मावरुन वाद विवाद वाचले. वट सावित्री कसा बुरसटलेला सण आहे हे वाचले. कीव आली आजच्या सो कॉल्ड "आधुनिक विचार सरणीची".

ते सात जन्म आणि यम या पलिकडे आपण जात नाही, ग्लोबल वॉर्मींग बद्दल चर्चा हिरीरीने करतो. मग मॅरेथॉन काय, अर्थ डे, ग्रीन डे काय? हे डे साजरे करणे म्हणजे पुढारलेपण का? वट सावित्री राहो पुराणात पण "Big Banyan day" असं तरी काही साजर करा. एक झाड (सण) मोडलत तरी एक नविन झाड लावालाना, सगळ उजाड करणारी आधुनिकता कसली?

वयस्कर लोकांसाठी वजन कमी करण्याचे उपाय

Submitted by चिंगी on 6 June, 2011 - 03:14

वयस्कर लोकांचे वजन कमी करण्यासाठी वा वजन आटोक्यात राहण्यासाठी काही उपाय माहीत असतील तर कृपया इथे लिहा. वेगळा धागा उघडला आहे कारण बर्‍याचदा वयामुळे त्यांच्या आहार- विहारांवर मर्यादा असतात पण वाढत्या वजनाचा त्रासही होत असतो. एखाद्या छोट्या-मोठ्या ऑपरेशनमुळे घेतलेली बेडरेस्ट वजन वाढवायला कारणीभुत ठरते आणि मग नंतर त्यातुन दुसरेच त्रास सुरु होतात. त्या वयात झेपतील असे व्यायामप्रकारांबद्दल लिहीलंत तर दुधात साखर.. नाहीतर नको साखरेऐवजी शुगरफ्री बरे, तेवढ्याच कमी कॅलरीज! Proud

कुणाला नेती पॉट्चा (Neti Pot) अनुभव आहे का

Submitted by माणूस on 16 May, 2011 - 12:53

गेल्या वर्षापासुन मला परागकणांचा त्रास (pollen allergy) व्हायला लागलाय. त्यावर मला एकाने नेती पॉट वापर असे सांगीतले. कोणाला ह्याचा अनुभव आहे का

आरोग्यरक्षणाचा किमान अर्थ

Submitted by नरेंद्र गोळे on 7 April, 2011 - 02:20

गुरुवार, ७ एप्रिल २०११ हा जागतिक आरोग्यदिन म्हणून साजरा केला जात आहे.

काय आहे आपल्याकरता ’आरोग्याचा अर्थ’?

डॉ.आनंद नाडकर्णी यांनी अनेक दशकांपूर्वी एक पुस्तक लिहिले होते, ज्याचे नाव होते 'वैद्यकसत्ता'.

आजच्या संपन्न जीवनात वैद्य म्हणजेच डॉक्टर अनभिषिक्त सत्ता गाजवू लागलेले दिसून येतात. तर आजच्या विपन्न जीवनात वैद्य म्हणजे डॉक्टर, औषधालाही सापडत नाही अशी अवस्था प्रत्यक्षात आहे.

शिथिलीकरण

Submitted by नरेंद्र गोळे on 26 March, 2011 - 06:36

शरीर दैनंदिन जीवनात अनंत ताणतणावांचा सामना करते. त्यांच्यातून मुक्ती मिळविते. न जमल्यास त्यांना शरण जाते. तेव्हा ते ताण, मान, खांदा, पाठ, कमर, गुडघे, घोटे इत्यादी आणि इतरही सर्व अवयवांमधून अवघडून राहतात. त्यांना मुक्तीची अपेक्षा असते. विशेषतः जे निदानित हृदयरुग्ण असतात त्यांच्यात तर ताणतणावांना शरण जाण्याची प्रवृत्ती घडत जाते. म्हणून रोगग्रस्त, अस्वस्थ, अवघडलेल्या स्थितीत कुठलेही इतर व्यायाम, प्राणायामादी प्रकार करण्याआधी शरीर पूर्णतः सैलावण्याची गरज असते. हे साधण्याच्या प्रक्रियेस प्रगतीशील शिथिलीकरण उपयोगी ठरते.

शब्दखुणा: 

मनोव्यवस्थापन

Submitted by नरेंद्र गोळे on 7 March, 2011 - 07:12

मन कुठल्याही एका गोष्टीवर एकाग्र होत नाही. आपण ऑफिसला जायला निघतो तेव्हा घरातल्या समस्या सोबत करत असतात आणि घरी परततो तेव्हा कार्यालयीन डावपेचांनी मन व्याप्त असते. ह्यातून बाहेर पडण्याचा राजमार्ग म्हणजे ओंकार जप, प्रार्थना, कल्पनाचित्रण इत्यादींच्या उपयोगाने मन एकाग्र करण्याची किमया साधणे. ह्यालाच 'ध्यानधारणा' म्हणतात. बहिणाबाई चौधरींनी मनाचे खूपच सुंदर वर्णन करून ठेवलेले आहे. त्या म्हणतातः

मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर । किती हाकला, हाकला फिरी येत पिकावर ॥

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - आयुर्वेद