जेवण तर झालं...........................

चिरुमाला (भाग ५ )

Submitted by मिरिंडा on 29 May, 2018 - 08:40

जेवण तर झालं. पुन्हा हात धुण्यासाठी कीचन मध्ये जाणं भाग होतं. पण आता मला भीती नव्हती. मी आत जाऊन परत बेतानेच नळ सोडला. हात धुतले. जेवणाची भांडी धुऊन ठेवली . येताना मी सहज सरदारांच्या चित्राकडे पाहिले. ते माझ्याकडे जास्तच उग्र नजरेने बघत असल्यासारखे वाटले. कदाचित माझं येणं त्यांना रुचलं नसावं. मग मी कीचनमधला लाईट बंद करण्यासाठी गेलो. एकवार नजर सगळीकडे फिरली. का कोण जाणे , मघाशी मोठ्ठे असलेले कीचन मला जास्तच चिंचोळे वाटू लागले. म्हणजे कोनाडे , फडताळ जागच्या जागीच होतं. पण मी जास्त विचार न करता लाईट बंद केला. बाहेर आलो. आता मात्र मी सरदारांच्या चित्राकडे बलपूर्वक पाहिलं नाही.

Subscribe to RSS - जेवण तर झालं...........................