गझल - गहाळलेली वर्षे दे की परत मला

गझल - गहाळलेली वर्षे दे की परत मला

Submitted by बेफ़िकीर on 17 May, 2018 - 05:23

गझल - गहाळलेली वर्षे दे की परत मला

गहाळलेली वर्षे दे की परत मला
खिडकीमध्ये बघूनही जी वरत मला

घर तर होते तसेच आहे अजुन तुझे
तसे इशारे पण ते नाही करत मला

मीट पापण्या, घरंगळूदे तिला जरा
डोळे म्हटले स्वतःत पाणी भरत मला

तुला उधळले ज्यांच्यावरती मी कायम
तीच माणसे आयुष्या विस्मरत मला

तुझे न असण्याचा परिणाम असा झाला
दुनिया बसते गृहीत आता धरत मला

तुझी निकड आकळली, आता कुशीत घे
थकवा येतो इथे तिथे वावरत मला

अजून वेड्या विचार करतोस तू तिचा?
तिच्याविना मर म्हटली दुनिया मरत मला

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - गझल - गहाळलेली वर्षे दे की परत मला