समाजमन

येरे येरे कावळ्या...

Submitted by अतुल ठाकुर on 27 April, 2018 - 01:18

समाजातील काही चालीरितींमध्ये राजकारण कसं असतं आणि त्याचा वापर "पॉवर" साठी कसा करता येतो हे आपल्याकडील मरणाच्या आणि तोरणाच्यादेखील प्रसंगांमध्ये दिसत असते. समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला याचा अभ्यास करणं महत्त्वाचं वाटतं. वैयक्तीक आयुष्यातही दुर्दैवाने काही दु:खद प्रसंगी आपल्याला हजर रहावं लागतं. अशावेळी अगदी मुद्दाम नाही पण काही ठिकाणी लक्ष जातंच आणि काही गोष्टी लक्षातही राहतात. अलिकडेच नात्यात एका वर्षश्राद्धाला जावं लागलं. आजुबाजुच्या बायकांनी जमून जेवण करण्याची पद्धत आमच्याकडे इतिहासजमा झाली आहे. त्यामुळे एक छोटासा टेंपो जेवणाच्या पदार्थांनी भरून आला होता. श्राद्ध विधी झाले होते.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - समाजमन