नको म्हटलीच तर जाईल वाया खेप एखादी

नको म्हटलीच तर जाईल वाया खेप एखादी

Submitted by बेफ़िकीर on 18 April, 2018 - 11:01

१८ एप्रिल २०१८ -

गझल - नको म्हटलीच तर जाईल वाया खेप एखादी

नको म्हटलीच तर जाईल वाया खेप एखादी
तिच्या हृदयाकडे घेऊन पाहू झेप एखादी

कुठे नाहीच दिसणे हे तिचे दिसणेच आहे की
जखमही लावते जखमी मनावर लेप एखादी

नको हा कायदा जो पाप म्हणतो भ्रूणहत्येला
असीफा घेत आहे सारखा आक्षेप एखादी

घरी आला पती जाळून काही मेणबत्त्या की
मुक्याने चार भिंतीआत सोसे रेप एखादी

किती सायास केले वाहवासाठीच लिहिण्याचे
व्यथा करतेच दर ओळीत हस्तक्षेप एखादी

जगामध्ये नको मिरवूस आरस्पान चारित्र्या
तळाशी ना दिसो अभिसारिका निर्लेप एखादी

Subscribe to RSS - नको म्हटलीच तर जाईल वाया खेप एखादी