कविता kavita Marathi

माझी मराठी

Submitted by पल्लवीजी on 27 February, 2018 - 15:18

माझी मराठी

भावार्थदीपिका माऊलीची
अभंग गाथा तुकारामाची
मनाचे श्लोक दासबोधी
भारुडे एकनाथांची.
मंगल वाणी विठुरायाची...
माझ्या मराठीला लाभली !

सह्याद्रीची निधडी छाती
काळ्या कातळाची कणखरी
अविचलता सिंधुदुर्गाची
मऊ माया लाल मातीची.
मर्दुमकी शिव-मावळ्यांची...
माझ्या मराठीला लाभली !

ह्या भाषेची थोरवी अशी
दगडी जाते गाते इथे ओवी !
रमती चिपळ्या-एकतारी किर्तनी
वीर पोवाडे शाहीरांस स्फुरती.
नाट्यसंगीत, लावणी अदाकारी...
माझ्या मराठीला लाभली !

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कविता kavita Marathi