दार्जिलिंगच्या पोरींनो

दार्जिलिंगच्या पोरींनो

Submitted by बेफ़िकीर on 14 February, 2018 - 06:30

कविता - दार्जिलिंगच्या पोरींनो

चांदीच्या कांतीची झळ सोसेना ह्या डोळ्यांना
चामर वृत्ताची शेखी लय देते हिंदोळ्यांना
जाग तुम्हाला आल्यावर फुलते अवघी वसुंधरा
दार्जिलिंगच्या पोरींनो सुंदर दिसणे कमी करा

प्रश्न काश्मिरी गालांचा सुटता नाही सुटत कधी
आणि तांबडे शरमेने पूर्वेला ना फुटत कधी
समेट घडवा नभासवे कराच खंडित परंपरा
दार्जिलिंगच्या पोरींनो सुंदर दिसणे कमी करा

कटाक्ष काजळभरे सुरे गुलाब ओठांमधे मुरे
केस मुलायम सोनेरी, दर्शनास आरसा झुरे
बर्फील्या रस्त्यांचाही होतो शाही मुशायरा
दार्जिलिंगच्या पोरींनो सुंदर दिसणे कमी करा

Subscribe to RSS - दार्जिलिंगच्या पोरींनो