परक्या परक्या दिशा दहाही आता

परक्या परक्या दिशा दहाही आता

Submitted by बेफ़िकीर on 31 January, 2018 - 11:22

परक्या परक्या दिशा दहाही आता
कोणाचाही कोणी नाही आता

मीही आता मौन सोडतो माझे
तूही बोलू नकोस काही आता

वेळेवर शेपूट घातले होते
सरसावत आहे तो बाही आता

पुन्हा नवा आय डी मिळाला त्याला
डबकेही वाटेल प्रवाही आता

मला सातवा मानत बसले वेडे
शत्रू झाले ऋतू सहाही आता

बहुसंख्यांकांपैकी असूनसुद्धा
म्हणत राहतो त्राही त्राही आता

'बेफिकीर'ती, मी लाजाळू झालो
समजेना मांजरा इलाही आता

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - परक्या परक्या दिशा दहाही आता