किमयागार

किमयागार

Submitted by Asu on 7 December, 2018 - 21:56

किमयागार

अजब तुझे डोळे गड्या
अफाट तुझी स्मृती
प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर
दिसे हुबेहूब कृती

रेटिन्यावर तुझ्या लिंपिले
सिल्व्हर हलाईडस् थेट
निगेटिव्ह पॉझिटिव्ह करण्या
धडपडे अंधारी थायोसल्फेट

डिजिटल तू आज जाहला
अद्भुत अचंबित खूप
सेंसोर चिपेवर पिक्सेल
साठवी तेजस्वी रंग रूप

बटण दाबता होतो मानव
तुझ्यात कैद क्षणात
सुंदऱ्या वा असो बंदऱ्या
सदैव तुझ्या प्रेमात

उपकार तव कॅमेरेदादा
झाले आम्हावर भारी
तुझ्याविना कोण करील
आम्हां अमर या संसारी

शब्दखुणा: 

' किमयागार'

Submitted by मकरन्द वळे on 15 December, 2017 - 04:39

कधी पर्णहिन शिशिर तर कधी वसंत हिरवागार
तूच निर्मिसी हिमालय कधी ज्वालामुखी अंगार
अथांगशा त्या आभाळाचा लिलया वाहसी भार
तू अगाध किमयागार ईश्वरा अगाध किमयागार
-----१
विविधता अगणित दाविते तव सर्जन आविष्कार
पठार पर्वत, खोल दरी कुठे जमीन काळीशार
जलधी ,प्रपात , सरिता अन् कधी पर्जन्याची धार
तू अगाध किमयागार ईश्वरा अगाध किमयागार
------२
कुणास देसी रंग मनोहर, कुणा कंठी तान सुस्वर
कुणास शिंगे, कुणास शुंडा, शेपूट झुपकेदार

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - किमयागार