भोंदू गुरूंच्या शिष्यांसाठी...

मृगजळाचे चषक भरुनी

Submitted by अनन्त्_यात्री on 17 November, 2017 - 05:24

मुखवटे त्यांचे दिखाऊ, प्रिय तुला प्राणाहुनी
मात्र ते अपुलाच चेहेरा बघू न धजती दर्पणी !

मृगजळाचे चषक भरुनी पाजले त्यांनी तुला
स्वार्थ अन भोगात केवळ, पाय त्यांचा गुंतला

प्रेषितांचे पाय कसले? मातीची ती ढेकळे !
पूज्य ते बनले तुझ्या त्या आंधळ्या भक्ती मुळे !

अजुनी नाही वेळ गेली, सोड त्यांची संगत
सोड ते हतवीर्य जगणे, सोड उष्टी पंगत

आतला आवाज सांगे, ऐक त्याचे सांगणे,
“कवडीमोले विकू नको तू लाखमोलाचे जिणे”
"तूच धर्ता तूच कर्ता, दास्य श्वानाचे जिणे"

Subscribe to RSS - भोंदू गुरूंच्या शिष्यांसाठी...