कविता

मृगजळ

Submitted by Milesh on 18 December, 2007 - 23:08

प्रेमाच्या शोधात निघालो मी
आपल्याजवळील कल्पनाविश्व बरोबर घेऊन
ती भेटली मला त्या वाटेवर
माझ्या आशेची पालवी बनून

तिचा आवाज मी ऐकला जेव्हा
मनात अनेक तरंग ऊठले
मलाच नव्हते कळत माझे
शब्द घ्यावे कुठुन कुठले

गुलमोहर: 

घरटे..

Submitted by प्राजु on 18 December, 2007 - 14:19

घर ते माझे बालपणीचे
रंगबिरंगी आठवणीचे..
आईबाबांच्या पंखाखाली
मांडलेल्या भातुकलीचे..

प्राजक्त, तुळस, कदंब अंगणी
वेल जुईची बहरली होती..
सैरवैर त्या अंगणी माझी
इवली पाऊले नाचली होती..

झोपाळ्याची जुनीच करकर

गुलमोहर: 

प्रवास

Submitted by abhishruti on 18 December, 2007 - 06:21

खूप वर्षापूर्वी लिहिलेली डायरी सापडली, तेव्हा लिहिलेली एक कविता

कधीतरी मला विलक्षण ओढ लागते
वाटतं, वाटतं - दिसेल त्या वाटेने तुझ्याकडे धावत सुटावं
त्या भावनेच्या भरात मी धावतही सुटते
त्या धावण्यातही एक मजा असते

गुलमोहर: 

ओळखीचे मुखवटे

Submitted by सत्यजित on 18 December, 2007 - 06:21

अज्जुकाची निनावी कथा वाचताना सुचलेली कविता इथे पोस्ट करतो आहे... म्हंटल तर संबध आहे म्हंटल तर नाही..

रोज नवे मुखवटे बदलताना आपण आपल्यालातर विसरुन जात नाही ना... असूही किंवा नसूही... पण अनोळखी जगात वावरताना...

गुलमोहर: 

जुना शब्द

Submitted by पल्ली on 16 December, 2007 - 09:55

फार जुना शब्द एक
आज मला आठवला
जुन्या पुस्तकावरची सारी
धुळ उडवीत बसला.
एकेक पान उघडलं
सारं सारं आठवलं
आठवता आठवता मनात
आभाळ भरुन आलं.
गच्च भरलेल्या ढगानं
हळुच थेंबांना सोडलं,
उघडलेल्या पुस्तकावर
अश्रु बनून सांडलं...

गुलमोहर: 

गावाकडचे घर

Submitted by swaroopasamant on 14 December, 2007 - 04:47

दरवळला प्रजक्तं
तो धुंद गंध गगनात
मोहरला जर्द फुलांनी
तो आम्रतरु राईत ||

त्या सान पाननीतुन
नितळ पाण्याची खळखळ
पल्याडच्या बागेतून
लक्ष्य पानांची सळसळ ||

ते मंदिर, ती शाळा
ती विहीर, तो झरा
वडाच्या पारंब्यांचा

गुलमोहर: 

उद्या

Submitted by प्रिंसेस on 10 December, 2007 - 05:54

ही कविता माझ्या पपांची... त्यांच्याच एका इंग्रजी कवितेचा त्यांनीच केलेला अनुवाद. ऍक्सिडेंट नंतर बरेच महिने माझे वडिल कोमात होते ("न संपणारी गोष्ट" मध्ये सांगितलय कदाचित मी.) त्यामुळे बर्‍याच गोष्टी करायच्या राहुन गेल्यात, तेच सांगितलय यात..

दिवसामागुन दिवस गेले
उदया जगेन म्हणतांना
माझे जगायचे राहुन गेले...

सुटले होते काही हात
काळाच्या प्रवाहात
उद्या शोधेन म्हणतांना
ते कायमचे हरवुन गेले

उडायचे होते काही क्षण
स्वतःच्याच आकाशात
उद्या उडेन म्हणतांना
माझे पंख कापले गेले

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता