कविता प्रेम गुलाब

गुलाब

Submitted by माउ on 29 September, 2017 - 12:07

तुला काय सांगू कुठे जात आहे
तुझे दिन सारे तुझी रात आहे..

जरा सूर दे ना झरोक्यात ये ना
इथे चंद्र अर्धा नभी गात आहे ..

कळेना कसे चांदणे आवरू मी
मनी शिंपडूनी कुणी जात आहे..

नव्याने आता भाळणे होत नाही
आठवण जुनीशी दिमाखात आहे..

बागेत थांबवेना फुलांत जीव नाही
अजून श्वास तुझ्या गुलाबात आहे ..

-रसिका

Subscribe to RSS - कविता प्रेम गुलाब