बिंब कैवल्याचे

चंद्रमण्यांचे पाझर

Submitted by अनन्त्_यात्री on 11 September, 2017 - 02:31

आज माझ्या ओंजळीत
चंद्रमण्यांचे पाझर
भले विझून जाऊदे
माथ्यावर चंद्रकोर

आज माझ्या नजरेत
दिव्य रंगांचे वितान
भले अंधुक होउदे
इंद्रधनूची कमान

आज माझ्या रोमरोमी
ब्रह्मकमळ फुलेल
बिंब कैवल्याचे मग
पाठोपाठ उगवेल

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बिंब कैवल्याचे