अस्वस्थ साद

अस्वस्थ साद

Submitted by _तृप्ती_ on 1 September, 2017 - 02:48

किती सांगू आणि काय सांगू, खूप दडलंय खोलवर आत
प्रश्नांची दाटीवाटी आणि एक अस्वस्थ साद

संस्कार नाही शिक्षणाने
आणि पैसा नाही तत्वाने
देवीला पुजणारेच, खुडतात कळीला
स्त्रीमुक्तीचा नारा, मग भिडतो का आभाळा

घाम गाळणाऱ्याभवती मृत्यूचा फास
उंटावरून हाकणारा आहे राजकुमार
मातीतून सोने उगवेल, आहे फक्त भास
दैत्याच्या घरी मात्र पैश्याची रास

तापते आहे धरणी सारी, आटतो आहे झरा
पाण्याच्या थेंबासाठी, माणूस झटतो आहे खरा
झाडे ढाळतात अश्रु मुके, पक्षी सोडतात प्राण
मुक्या सुक्या जमिनीची, आहे का कोणा जाण

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - अस्वस्थ साद