प्रेमरंग

प्रेमरंग

Submitted by महादेव सुतार on 26 July, 2018 - 03:09

एका मुलीचं आणि मुलाचं एकमेकांवर खूप प्रेम होतं मुलगा गरीब होता मुलगी श्रीमंत होती
पण त्या मुलीला मुलगा गरीब आहे ते माहीत नव्हतं
पण त्या मुलाचा मित्र श्रीमंत होता
श्रीमंत मित्र त्या मुलाला पैसे गाडी फिरवायला द्यायचा आणि तो मुलगा त्या मुलीला गाडीवरून फिरवायचा हॉटेलमध्ये जेवायचे थिएटर ला जायचे
एक दिवस ती अचानक भेटायला आली
त्यावेळी तिने पाहिलं
तिला सगळं काही कळलं त्या मुलाबद्दल
पण ती काही बोलली नाही तेथून घरी आली
आणि शांतपणे विचार करायला लागली
रात्र झाली झोपी गेली
दुसऱ्या दिवशी ती त्या मुलाला भेटायला जात होती

विषय: 
शब्दखुणा: 

प्रेमरंग

Submitted by र।हुल on 22 August, 2017 - 13:09

नजर भिरभिरते त्याची
गंमत मजला वाटते
बघुनी त्याला मी
बावरून कधी जाते

खळखळून तिचं हंसणं
वेड मजला लावतं
थरथरल्या ओठांनी
अबोल काही बोलतं

गंभिर त्याचं बोलणं
आधार कधी बनतं
साधंच त्याचं वागणं
भारावून मला टाकतं

सुंदर तिचं दिसणं
बघत रहावं वाटतं
हळूच तिचं लाजणं
भान माझं हरवतं

त्याचं वेड हे लावणं
हलकेच मिठीत घेणं
रंगवेड्या स्वप्नांना
हळूवार कवटाळतं

अलगद बाहूंत येणं
स्वप्नांत हरवून जाणं
तिचं समर्पित हे होणं
नव्यानं प्रेमात पाडतं

―₹!हुल/ २२.८.१७

Subscribe to RSS - प्रेमरंग