नितिनचिंचवड

खर्‍या अर्थाने

Submitted by नितीनचंद्र on 8 September, 2010 - 19:47

भाषण करताना अनेक वक्त्यांना "खर्‍या अर्थाने" असा शब्द प्रयोग वापरायची सवय असते. उदा.

१) जर आपण ....च्या मार्गांने चाललो तर त्यांना खर्‍या अर्थाने श्रध्दांजली वाहिली असे होईल.
२).... खर्‍या अर्थाने नविन संकल्प मानावा लागेल.
३) ...खर्‍या अर्थाने या उपक्रमात आपण सहभागी झालात असे म्हणता येईल.

हा खरा अर्थ म्हणजे काय ? कोणत्याही कृतीचा खोटाही अर्थ असतो का ? फसवा अर्थ असतो का ? बहुदा कोणत्याही कृतीबाबतची अधीक अपेक्षा व्यक्त करताना हा शब्द प्रयोग प्रचलीत झाला असावा. पण नेमक्या शब्दात व्यक्त न करता आल्याने किंवा त्या वेळेस तसे योग्य नाही असे वाटल्याने असा शब्द प्रयोग पुढे रुढ झाला असावा.

गुलमोहर: 

धर्म

Submitted by नितीनचंद्र on 12 August, 2010 - 11:31

अजस्त्र वृक्ष जेव्हा बांडगुळ घेऊन उभा असतो.
त्याला माहित असते, ही आयुष्याला लागलेली किड आहे.
अजस्त्र वृक्षाची एक फांदी जेव्हा कुर्‍हाडीचा दांडा बनते.
त्याला माहित असत हीच आपल्या अंताची नांदी आहे.

सामवुन घेणे आणि जे जे जमेल ते ते देणे
हाच धर्म जाणुन तो वृक्ष हे करत असतो.

त्याला हे माहित असत, आपलही आयुष्य हे क्षणभंगुर आहे.
वादळाच्या लाटेत हे संपु शकत.
तोवर व्हाव सहारा, बांडगुळांचा, पक्षांचा आणि मानवाचा.

त्यांच्या लेखी नसेल कृतज्ञता म्हणुन काय मी माझा धर्म सोडायचा ?
विधात्यान मला हाच धर्म सांगितलाय, तो का म्हणुन मोडायचा ?

उगवेल तो सुदिन जेव्हा प्रत्येकाला आपला धर्म समजेल.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - नितिनचिंचवड