मोबल्या

जेथे जातो तेथे....

Submitted by चामुंडराय on 26 July, 2017 - 17:30

जेथे जातो तेथे....

जेथे जातो तेथे तो माझा सांगाती
चालतो तयाला हाती धरुनिया

गेलो कोठेही तरी तयाचा आधार
दाखवितो मार्ग सदैव मजला

सगळे ते नम्बरं तयाच्या लक्षात नीट
कनेक्टेड रात्रंदिन केलो देवा

तयासी मी सदा खेळतो कौतूके
नेट वरी सुखे संचार अंतर्बाही

बॅटरी होता डाऊन जीव कासावीस
धाव घेतो सत्वर चार्जर कडे

इंग्रजी, मराठी टाईपतो वेगे
त्यानेची अंगठे बहाद्दर केलो देवा

जगात नेटवर्क्स विविध अनेक
ड्युएल सिमकार्ड वापरी प्रसंगी

बॅलन्स तो संपतो असा भरभर
रि-फिलचे बळ अंगी देई देवा

Subscribe to RSS - मोबल्या