चाफा बोलेना...

इतक्या लाल रंगाचा चाफा मी प्रथमच पाहिलाय इथे आमच्या ऑफिसमध्ये.

इतक्या लाल रंगाचा चाफा मी प्रथमच पाहिलाय इथे आमच्या ऑफिसमध्ये.

मागच्या रविवारी बंगलोरच्या इंदिरानगरच्या प्रशस्त अश्या रस्त्यावर स्वांतसुखाय भटकंती करताना घेतलेलं प्रकाशचित्र.
मागे okrut वर काही फोटो अपलोड केले होते.. आज laptop आवरताना अचानक ते सापडले.
कामेर्याची सेटींग बदलून, काही काही प्रयोग करुन वेगवेगळ्या ट्रिप्स च्या वेळी काढले होते..
रंगीबेरंगी वर अपलोड करायचा आज मुहूर्त लागला.. 

बंगलोरमधे आजकाल बर्याच ठिकाणी अशी बहरलेली झाडं दिसताहेत. अश्याच एका झाडाचा हा फोटो.

माझ्या शेजारणीकडचं हे जांभळ्या फुलांचं एक छोटसं झाडं. सद्ध्या त्याला अशी खूप फुलं आली आहेत. बहरलय नुसत!