निसर्ग

अग्गोबाई.. कळसुबाई..!

Submitted by Yo.Rocks on 30 June, 2011 - 14:50

महाराष्ट्राच्या सह्याद्रीरांगेत ५००० फूटाच्या वरती मानाने उभी असणारी तीनच शिखरे ! तिसर्‍या क्रमांकावरती असलेले 'घनचक्कर' चे मुडा शिखर, दुसर्‍या क्रमांकाचे 'साल्हेर'वरती असलेले 'परशुराम मंदीरा'चे शिखर नि पहिल्या क्रमांकावरती सह्याद्री रांगेतील सर्वोच्च शिखर असलेले सुप्रसिद्ध 'कळसुबाई शिखर' ! उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ५४०० फुटच्या आसपास ! [मायबोलीकर 'हेम' ने माहिती दिल्याप्रमाणे : कळसूबाई(१६४६ मी.) , साल्हेरवरील परशुराम मंदीर (१५६७ मी.) आणि घनचक्करवरील मुडा (१५३२ मी.)]

सौरकुंडी खिंड (१)

Submitted by मंजूताई on 27 June, 2011 - 10:58

३ मे - (होराथॅच)आजचाही ट्रेक जास्त नव्हता व चारवाजेपर्यंत पोचायचे असल्यामुळे निघायची गडबड-धावपळ नव्हती. आरामात नाश्ता करून, डबे भरून निघालो. नितांत सुंदर हिरवाई व सोप्पी चढण. काही-काही गोष्ट वर्णनातीत असतात. शब्दात सामावणं कठीण असतं. एकदा जाऊन आलो की आपण ह्या निसर्गाच्या अश्या काही प्रेमात पडतो की परत परत जावंस वाटतं. हिमालयाची शिखरं साद देत राहतात. काहीजण नुसतेच प्रेमात पडतात तर काही बनतात व्यसनी. पंचावन्न अधिक वयाच्या तडवीकाकांकडे बघून असंच वाटतं. ते लेह-लडाख माउंटन बायकिंगला गेले असताना त्यांचा पाय मोडला.

मासे पैदास करण्याबद्द्ल : शोभेचे मासे

Submitted by कुचि on 27 June, 2011 - 03:04

मला शोभिवंत मासे पालनाबद्द्ल माहिती हवी आहे. मागे बागुलबुवा यानी लिहिलेला लेख वाचला होता. माझ्या घरी फिश आहेत. याउपर मला अजुन घरगुती व्यवसाय करण्याची इछा आहे.

सौरकुंडी खिंड

Submitted by मंजूताई on 24 June, 2011 - 11:36

८ मे -आज असं वाटतंय एक विखुरलेलं कुटुंब खूप दिवसांनी मंगलकार्यासाठी एकत्र आली आणि ते कार्य एकमेकांच्या सहकार्याने पार पाडून एकमेकांचा निरोप घेत आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कार्य निर्विघ्नपणे पार पडल्याचा आनंद, समाधान ओसंडून वाहत होते. दहा दिवसांपूर्वी हीच सगळी मंडळी एकमेकांना सर्वस्वी परकी, अनोळखी होती, हे कुणाला सांगितलं तर खरंच वाटणार नाही. ही वेगवेगळ्या जाती-धर्म, प्रांत, वर्गातील लोकं एकत्र यायला कारण होतं - सौरकुंडीपास ट्रेकिंग कॅंप. 'आना आपं बंगळुरू' म्हणत यतींद्र ग्रुपने निरोप घेतला.

शब्दखुणा: 

आपले सण, एक तंत्र आणि मंत्र.

Submitted by सत्यजित on 17 June, 2011 - 02:47

गेले काही दिवस बर्‍याच ठिकाणी, आपल्या संस्कृतीला लोक नाव ठेवताना दिसली. धर्मावरुन वाद विवाद वाचले. वट सावित्री कसा बुरसटलेला सण आहे हे वाचले. कीव आली आजच्या सो कॉल्ड "आधुनिक विचार सरणीची".

ते सात जन्म आणि यम या पलिकडे आपण जात नाही, ग्लोबल वॉर्मींग बद्दल चर्चा हिरीरीने करतो. मग मॅरेथॉन काय, अर्थ डे, ग्रीन डे काय? हे डे साजरे करणे म्हणजे पुढारलेपण का? वट सावित्री राहो पुराणात पण "Big Banyan day" असं तरी काही साजर करा. एक झाड (सण) मोडलत तरी एक नविन झाड लावालाना, सगळ उजाड करणारी आधुनिकता कसली?

"सांधण दरी"

Submitted by Yo.Rocks on 12 June, 2011 - 15:37

उन्हाळा सरत चालला नि आम्हा भटक्या मंडळींना ट्रेक्सचे वेध नाही लागले तर नवलच.. त्यात भटक्या मायबोलीकरांची बोलणी सुरु होतीच.. कुठे जायचे म्हणून.. यंदाच्या सिजनमधला पहिलाच ट्रेक साधा छोटा असावा म्हणून "सांधण दरी" ठरले.. साम्रद (तालुका:अकोले, जिल्हा: अहमदनगर)या छोट्या गावाजवळ असलेली ही सांधण दरी.. सुमारे दोनशे फूट खोल नि अंदाजे दिडकिलोमीटर पर्यंत विस्तार असलेली ही दरी म्हणजे नैसर्गिक चमत्कारच म्हणावा.. या दरीतून चालणे म्हणजे भूगर्भातून मार्ग काढतोय असे भासते.. थोडक्यात जमिनीला पडलेली भेगच म्हणायची..

अनुदिनी परिचय-६: वातकुक्कुट

Submitted by नरेंद्र गोळे on 12 June, 2011 - 07:57

अनुदिनी: वातकुक्कुट. हवामानशास्त्राची ओळख मराठीतून.

http://vatkukkut.wordpress.com/

अनुदिनीकार: वरदा वैद्य

अनुदिनीची सुरूवात: नोव्हेंबर २००६

अनुदिनीची वाचकसंख्या: २०१० मध्ये २,९००

अनुदिनीतील एकूण नोंदी: २३

सांधण दरी ! येणार का ?

Submitted by Yo.Rocks on 1 June, 2011 - 06:42
तारीख/वेळ: 
4 June, 2011 - 21:30 to 5 June, 2011 - 20:00
ठिकाण/पत्ता: 
सांधण दरी !

मे महीना उलटला नि आकाशात काळ्या पांढर्‍या ढगांची मैफील जमू लागली.. पावसाचीच चाहूल ती.. साहाजिकच उन्हाळ्यात उकाड्यामुळे मंदावलेल्या ट्रेकर्संना उत्साहाने नव्या जोमाने "तयार" होण्याची वेळ... पावसात कुठे कुठे जाता येइल नि कधी कधी सुट्ट्या टाकता येतील हे तपासण्याची वेळ.. ! पावसात आपले शूज/फ्लोटस धोका तर नाही ना देणार हे बघण्याची वेळ ! सॅकमधील सगळे सामान भिजू नये म्हणून एक भलीमोठी प्लॅस्टीकची पिशवी शोधण्याची वेळ ! पावसाळा सुरु होईल तेव्हा होईल पण जून महिना उजाडला की ट्रेक सुरुच झाले पाहिजेत..

प्रांत/गाव: 

ऊर्जेचे अंतरंग-१३: ऊर्जेच्या गरजेची विस्तारती क्षितिजे

Submitted by नरेंद्र गोळे on 31 May, 2011 - 08:19

आपली स्थापित वीजनिर्मितिक्षमता आणि वर्तमान पंचवार्षिक योजनेदरम्यान (२००७-२०१२) त्यात आपण घालणार असलेली भर खालील तक्त्यात दाखवलेली आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचा, जानेवारी २००८ मध्ये, असा दावा आहे की २०१२ मध्ये खालीलप्रमाणे स्थापित क्षमतेत भर पडल्यास आपल्या ऊर्जाविषयक गरजा पूर्णपणे पुरवता येतील.

Pages

Subscribe to RSS - निसर्ग