निसर्ग

सिंदोळा !

Submitted by Yo.Rocks on 6 October, 2011 - 13:04

रविवारची पहाट बर्‍याचजणांना माहीतच नसते.. रविवार उजाडावा तरी कसा.. तर डोळे उघडतील तेव्हा सूर्यदेवाची किरणे प्रखर झालेली असतील.. भलामोठा आssळस अशे अनेक आळस देत उठायचे.. घडयाळाकडे ढुंकूनही नाही बघायचे.. आज कसलीच घाई नाही म्हणत टिव्ही लावून वृत्तपत्र चाळत बसायचे.. चहाचे घुटके अगदी दिमाखात घेत किचनमध्ये तयार असलेल्या नाश्त्याचा अंदाज घ्यायचा इति इति...

हानामी (花見) : साकुरा

Submitted by सोकाजीरावत्रिलोकेकर on 7 September, 2011 - 07:03

हानामी (花見) : साकुरा

हानामी(花見), जपान मधे साधारण सातव्याशतकापासून चालू झालेली ही परंपरा आजही कसोशीने आणि हौसेने पाळली जाते. हाना(花)म्हाणजे साकुरा(桜、चेरी)चे फूल आणि मी(見) म्हणजे पहाणॆ. साकुराचा आलेला बहर पहायला जाणे म्हणजे हानामी. ही झाली पुस्तकी व्याख्या, पण जपानी लोक़ांची खरी व्याख्या आहे, हानामी म्हणजे मौज मजा, जत्रा, कुटुंबकबिल्यासोबत, मित्र-परिवारासोबत जीवनाचा आनंद लुटण्याचा काळ.

साकुरा

गणपती विसर्जन आणि प्रदूषण

Submitted by जागोमोहनप्यारे on 6 September, 2011 - 07:13

गणपती विसर्जन आणि प्रदूषण

आज गणपती विसर्जनाला दरवर्षीप्रमाणे नदीवर गेलो तर तिथे पोलिस आणि नगरपालिकेचे कर्मचारी उभे होते. त्यानी मूर्ती विसर्जनास प्रतिबंध केला. त्याऐवजी जवळच्या एका हिरवेगार घाण पाणी असलेल्या खंदकाचा पर्याय दिला किंवा नदीजवळ एक छोटी काहिल होती त्यात गणपती सोडायला सांगितला. निर्माल्य टाकायला वेगळी ट्रॉली होती.

हरताळका विसर्जनाच्या वेळी नदीकाठी भात, निर्माल्य, फुले आणि मूर्ती यांचा राडा-चिखल झालेला होता, म्हणून असे केले असे साम्गण्यात आले.

१. घरगुती गणपती आणि निर्माल्य विसर्जनाने फार मोठे प्रदूष्ण खरेच होते का?

सिद्धगड : दोघांची भ्रमणगाथा !

Submitted by Yo.Rocks on 29 August, 2011 - 17:25

मनात कितीही ठरवले तरी प्रत्यक्षात ते उतरणे बरेचदा कठीण होउन बसते.. सिद्धगडाबद्दलही तेच झाले.. पावसाळ्यात अनेक छोटे-मोठे धबधबे पोटाशी बारगळणारा हा गड यंदाच्या पावसात तरी सर करण्याचे ठरवले होते.. पण काही जमत नव्हते..शेवटी जायच्या आदल्यादिवशी ठरले एकदाचे.. मी आणि जो (गिरीश जोशी).. पण दुकट्याने ट्रेक करणे धोक्याचे त्यात हा जंगलाने वेढलेला गड असे ऐकून होतो सो पुन्हा संध्याकाळी हा ट्रेक रद्द करण्याचे मनात आले.. तीला सांगितले तर तीसुद्धा 'नाही जायचे' करू लागली.. म्हटले जाउदे नको करूया ट्रेक !! तोच पुन्हा जो चा फोन आला.. " यो, चल रे जाउ.. रिस्क न घेता जिथपर्यंत जमेल तितके जाउ. नि परत येऊ..

सह्याद्रीनवल ..... सांदण दरी

Submitted by रोहित ..एक मावळा on 20 August, 2011 - 10:03

राकट .. कणखर सह्याद्री ...
आसमंताला भिडलेल्या उंचच उंच शिखरांचा सह्याद्री .....
खोलच खोल दर्‍या-खोर्‍यांचा सह्याद्री ...
काळजाचा ठोका चुकविणार्‍या कोकणकडांचा सह्याद्री...
निसर्गसंपत्तीने नटलेला सह्याद्री.....
सह्याद्री
... बस्स नावात सगळ सामावलेल आहे.

रतनगड... प्रवरेच्या साथीने...

Submitted by सेनापती... on 31 July, 2011 - 11:06

३ वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्यात मी आणि माझे काही मित्र-मैत्रीणी असे एकूण १० जण रतनगड़ला गेलो होतो. रतनगड़ माहीत नसेल असा कोणी डोंगरवेडा असेल अस नाही मला वाटत. १ तारखेला रात्री शेवटच्या, म्हणजे खरतर २ तारखेला पहाटे आम्ही कल्याणहून निघालो. प्रचंड पाउस पडत होता. इतका की इगतपुरीला पोहचेपर्यंत आम्ही जवळ-जवळ पूर्ण भिजलो होतो. पहाटे ३ च्या आसपास तिकडे पोचलो आणि स्टेशनवर बसून होतो. उजाडल की शेंडी गावची बस पकडून आम्हाला रतनगडाकड़े सरकायचे होते. पहाट व्हायला लागली तशी स्टेशनवर वर्दळ वाढायला लागली. आम्ही मस्तपैकी कटिंग चहा मारला आणि बसस्टैंडकड़े निघालो.

स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १

Submitted by अभय आर्वीकर on 22 July, 2011 - 13:54

स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १

Lonely Walk.. एक सुखद अनुभव !

Submitted by Yo.Rocks on 20 July, 2011 - 15:56

पावसाने एकदा जम बसवला की हिरव्या निसर्गाचे सौंदर्य बघण्यासाठी मुंबईतील निसर्गरम्य ठिकाण म्हणजे नॅशनल पार्क(संजय गांधी राष्ट्रीय उद्यान).. तशी अधुनमधून फेरी असतेच इकडे.. पण पावसात जाण्याची मजा काही औरच असते... गेल्याच शनिवारी हे पार्क गाठले तेव्हा जवळपासचा परिसर बघून परतायचा विचार होता.. पण खुललेल्या निसर्गामध्ये दंग झालो.. नि चालता चालता थेट कान्हेरीच गाठले.. !

निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

विषय: 
शब्दखुणा: 

विही वॉटरफॉल रॅपलिंग !

Submitted by सुन्या आंबोलकर on 5 July, 2011 - 06:10
तारीख/वेळ: 
9 July, 2011 - 05:23 to 10 July, 2011 - 08:30
ठिकाण/पत्ता: 
विही गाव, मुंबई-नाशिक महामार्ग

नमस्कार ! मागील वर्षी विही येथील वॉटरफॉल रॅपलिंगमध्ये बर्‍याच मायबोलीकरांनी सहभाग घेतला होता.. खूप धमाल केली होती शिवाय क्षणभर थरारक वाटणारे पण सोप्पे असणार्‍या या रॅपलिंगचा आस्वाद घेतला होता..
तर बर्‍याच जणांचे मिस झाले होते.. तेव्हा ज्यांनी मिसले वा पुन्हा अनुभव घेण्यास उत्सुक असाल तर येत्या विकेंडसाठी तयार व्हा...
'ऑफबिट सह्याद्रीज' ह्या ग्रुपने येत्या विकेंडला (९ जुलै व १० जुलै) विही धबधब्यावर रॅपलिंगचा कार्यक्रम ठेवला आहे.. इकडे नुसते रॅपलिंगच काय तर पाण्यात डुंबण्यासाठी एक छोटा नि एक भला मोठा असे दोन धबधबे आहेत.. म्हणजे फक्त चिंब चिंब धमाल असेल Happy

Pages

Subscribe to RSS - निसर्ग