निसर्ग

फुले किती बागेत उमलली

Submitted by पुरंदरे शशांक on 8 November, 2012 - 22:28

फुले किती बागेत उमलली

फुले किती बागेत उमलली
गोड गोडशी कितीतरी
फुलपाखरु होउनी जावे
गुंजत र्‍हावे फुलांवरी

रंग वेगळे किती किती ते
देतो यांना कोण बरे
वा-यावरती डोलत असता
भान हरपुनी मी निरखे

जाई जुई पांढरी शुभ्रसी
जास्वंदी ही लाल किती
केशरदेठी पारिजात हा
गंधित झाला परिसरही

गर्द जांभळी गोकर्णी ही
गुलाब फुलले कोमलसे
शेवंतीही पिवळी पिवळी
उन कोवळे पसरविते

ऊंचाउनिया मान केवढी
निशीगंधही उभा दिसे
मंद सुगंधी झुळका येता
मन मोहवुनि टाकतसे

किल्ल्यांवरची हागणदारी...!

Submitted by हेम on 7 November, 2012 - 12:41

तिनेक दिवसांची जोडून सुट्टी आली की हौशा- नवशा- गवशा तथाकथित ट्रेकर्स लोकांची धिंगाणा घालायला काही हॉटट्ट डेस्टिनेशन्स ठरलेली आहेत. नाणेघाटाची गुहा, हरिश्चंद्रगड आणि रतनगड! ...त्याच्यात पावसाळ्याचे दिवस असतील तर ही सगळी झुंबड डॉट कॉम राजमाचीला लॉग इन असते! त्यांचा गोंगाट, प्लास्टीक कचरा आणि एकूणच वर्तणुकीचा पारंपारिक त्रास सगळ्यांना नेहमीच होतो आणि हे प्रमाण वाढतंच रहाणार आहे. आणखी एक त्रासाचा प्रकार २ वर्षांपूर्वी पावसाळ्याअखेरीस आम्ही रतनगडला अनुभवला तो म्हणजे या गडावर मुक्कामी असलेल्यांच्या प्रातर्विधीचा!

'रतनगड' :सह्याद्रीचे आभुषण !

Submitted by Yo.Rocks on 5 November, 2012 - 21:32

पावसाळ्यातील आहूपे घाटाचा ट्रेक झाल्यानंतर मोठ्ठा ब्रेक होता.. गणेशोत्सव, नवरात्री झाली.. नि आम्हाला वेध लागले पुढच्या ट्रेकचे.. खरे तर ऑक्टोबर हिट मध्ये ट्रेक करण्यासाठी नाक मुरडतोच.. पण संध्याकाळची थंड हवा जाणवू लागली नि साहाजिकच गडावरची रात्र आठवू लागली.. ही ओढ वाढत असतानाच विन्याने 'हरिश्चंद्रगड नाळीच्या वाटेने' या ट्रेकचा नारा सुरु केला.. नि मागे- पुढे करता करता दिवस ठरला.. २७-२८ ऑक्टोबर.. नेहमीच्या येणार्‍या मायबोलीकरांना कळवले.. Proud सगळे राजी झाले..

मांजर, मी आणि 'तो'

Submitted by आंबा१ on 22 October, 2012 - 11:14

पंधरा दिवसांपूर्वी घरात एक छोटे मांजर आले. साधारण दोन एक महिन्याचे असावे. आमच्या पूर्वीच्या मांजराने नवा घरोबा केला असल्याने या नव्या जिवाला आनंदाने ठेऊन घेतले.

मांजर अगदी घरचेच झाले आहे. व्य्वस्थीत खाते, खेळते आणि माझ्याबरोबरच झोपते. स्वतःची स्वच्छ्तही छान राखते. घरच्या एका कोपर्‍यात त्याने त्याची सोयही केलेली आहे. इतरत्र कोठे घाण करत नाही.

हे ते आमचे गोड बाळ...

IMG0009A.jpg

आभाळ कवेत घेताना...

Submitted by रोहित ..एक मावळा on 17 October, 2012 - 12:36

आभाळ कवेत घेताना...
डोळ भरुन आल...
सरत्या पावसाच्या सरीत...
मन चिंब न्हाल.....

यंदा पावसाने पाठशिवणीचा खेळ केला.समाधानकारक नसला तरी बर्‍यापैकी पाऊस झाला.बाप्पाच्या विसर्जना नतंर त्यानेसुद्धा आपला निरोप घेतला.नेहमी वाजतगाजत येणारा पाऊस ... गडगडाट करतच गेला.आसमंतात तेव्हा रंगाची उधळण चालली होती.
आमच्या इमारतीच्या गच्चीवरुन तो नजारा टिपण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न....

प्रचि १.

मु.पो.तेर्से बांबार्डे - भाग २

Submitted by Yo.Rocks on 9 October, 2012 - 15:27

मु. पो. तेर्से बांबार्डे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.. ! पुन्हा एकदा भेट ! गेल्यावर्षी उन्हाळ्यात जाउन आलो होतो नि इथे फोटो डकवले होते.. आता निमित्त होते गणेशचतुर्थीचे... गणपतीत गावी जायचे म्हटले की लगेच मन हलके हलके वाटू लागते.. कोकणातला बाप्पा तर तन-मनात भिनलेला असतो.. शिवाय डोळ्यासमोर भातशेतीचे लांबच्या लांब हिरवे पट्टे उभे राहतात... कानांमध्ये भजनांचा आवाज दुमदुमू लागतो.. एकदम आल्हाददायक वातावरण निमिर्तीचा भास होतो... उगीच नाही गणपतीला कोकणात जाणार्‍या गाडया फुल असतात..

विलास नाईक ,लेख,,विचारधन ......

Submitted by vilas naik on 28 September, 2012 - 11:15

बनावट दस्तऐवजाचा तपास
जो फ्रॉड क्लेम करतो त्याला फ्रॉड सिध्द करावा लागतो. करार करताना फसवणुक केली व मा÷या नावाने खोटा करार केला किंवा खोट्या करारावर मा÷या ऐवजी दुसर्याी व्यक्तिने मा÷या खेाटया सहया केल्या. अशा मुख्य तक्रारी असु शकतात. फ्रॉडबाबत व फसवणुकिबाबत दिवाणी कार्यवाही ही करता येते. परंतु तो वेळ खाउ असल्याने अनेकदा अन्यायग्रस्त तक्रारदार हा फक्त चिटींगची केस करण्यासाठी उत्सुक असतो.

विषय: 

अद्भूत

Submitted by एस.व्ही. on 27 September, 2012 - 12:39

अद्भूत
--------------------------------

या भूतलावर काही गुढ रहस्य असते का? शाश्वत - अशाश्वतामध्ये काहीतरी सत्य दडले आहे असे म्हणतात. देव जाणे! पण खरेतर मानवी आयुष्य एक अगम्या गूढ आहे असेही कधी कधी वाटते. खरे खोटे देव जाणे! हा जाणता देव तरी कोण आहे की एका मायावी शक्तीलाच आपण पुर्वग्रहानुसार 'देव' असं संबोधतो? देव जाणे! काही असो....
पण मला वाटते तसेच कोणाला काही अद्भूत सापडेल तर इथे सांगावे ====>
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - निसर्ग