ब्रह्मपुत्रा : आसामी स्वातंत्र्ययुद्धाची स्फूर्तिगाथा
Submitted by झंप्या दामले on 21 February, 2017 - 10:28
स्वातंत्र्यदेवतेचा जयघोष ही अशी मात्रा आहे की जी चाटवल्यामुळे ग्लानी आलेला समाजात चैतन्य फुंकले जाते. स्वाभिमानी मन हे कायमच कुठलेही दास्य पत्करायला तयार होत नसते. ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले' हे सत्य जाणणारे अनेक पराक्रमी योद्धे या भारतभूमीवर होऊन गेले. परकीयांच्या ताटाखालचे मांजर होण्यापेक्षा स्वराज्याचा एल्गार करणारे शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. अकबराचे दास्य पत्करणे मान्य नाही म्हणून हल्दीघाटीचा संग्राम मांडणारे राणा प्रताप आपल्याला स्फूर्ती देतात. परंतु यांच्याइतकाच एक पराक्रमी योद्धा आपल्या पूर्वांचलात होऊन गेला याची माहिती फार थोडक्या मंडळींना असते.
शब्दखुणा: