अनंत ढवळे

बेरंग - भाग ४

Submitted by अनंत ढवळे on 3 November, 2016 - 18:08

मोठ्याच अंतराळानंतर घरी आलो आहोत. आईला आनंद होतो. ती काहीबाही बोलत राहते. एवढ्यात काय काय होऊन गेलंय ते सांगते. दरवेळी एखाद-दुसरा नातेवाईक ह्या ना त्या कारणाने गेलेला असल्याचे समजते. दरसाल माणसे पडत जातात. आईचं हे सांगणं बरेचदा 'माझे फारसे दिवस राहिलेले नाहीत' हे सांगणंच असतं. आपण ओळखून विषय टाळतो. ती आपल्यासमोर वैद्यकीय तपासण्यांची अख्खी फाईल मांडते. जणू आपल्याला हे सगळं समजतं आहे अशा उत्साहात आपण ते सगळं बघतो. आईला धीर देतो. ह्यावेळी तिचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे म्हणून डॉक्टरांनी तिला काही नवी औषधं सुरू केलीयत. बाटलीतलं ते लालभडक औषध बघून आपण उगाचच 'अरे वा' म्हणतो. 'भारीच औषध दिसतंय.

विषय: 
Subscribe to RSS - अनंत ढवळे