तत्त्वज्ञान

तडका - अंधश्रध्देत

Submitted by vishal maske on 10 August, 2015 - 22:38

अंधश्रध्देत

जिथे श्रध्देनं लोक जातात
तिथेही अंधश्रध्देत बुडतात
असे अंधश्रध्देचे प्रकारही
आता दाटीवाटीने घडतात

डोक्या-डोक्यात प्रगल्भ अशा
अंधश्रध्देच्या खाई आहेत
अन् अंधश्रध्दा पसरविण्याला
हल्ली बुवा बरोबर बाई आहेत,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - देवाच्या दारी,...!

Submitted by vishal maske on 10 August, 2015 - 10:35

देवाच्या दारी,...!

देवाला सर्व समान असतील
देवादारी समान आहेत का,.?
आपण हे काय करतो आहोत
सांगा याचे गुमान आहेत का,.?

साधे दर्शन,व्हिआयपी दर्शन
देवाच्या दारी ठेवलेले आहे
देवाच्या दारी बाजार मांडून
गुमास्त्यांचे फावलेले आहे

गरीब आणि श्रीमंत असे
भक्तांचे प्रकार होऊ लागले
अन् देवाच्या दर्शना साठीही
आता लोक तिकीट घेऊ लागले

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - धार्मिक धंदा,...?

Submitted by vishal maske on 9 August, 2015 - 21:33

धार्मिक धंदा,...?

भक्तांना मोहात पाडण्या
हवी तितकी हळवी आहे
अंधश्रद्धेनं बळावलेली ही
निव्वळ भुलवा-भुलवी आहे

धर्माच्या नावानं धंदा करणं
हा प्रकार काही नवा नाही
कसं सिध्द कराल की हा
नौटंकी प्रकार कावा नाही

एकामागुन एक प्रकारही
आता समोर येऊ लागले
अन् स्वयंघोषित धर्मगुरू
स्वयंदुषित होऊ लागले

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - राजकीय कृपा,...?

Submitted by vishal maske on 9 August, 2015 - 11:07

राजकीय कृपा

तीच्या विनासनद प्रकरणाला
त्यांनी मुद्दाम कानाडोळा केला
तीच्या अवांच्छितेतर वाढीचाही
त्यांनीच पुन्हा हुरसुळा केला

अनधिकृत बिल्डींगची अशी
शहरी कुजबुज झाली होती
तीच्या नियमबाह्य वाढण्याला
राजकीय कृपा केली होती,..?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - माणसांच्या जीवनात

Submitted by vishal maske on 8 August, 2015 - 22:30

माणसांच्या जीवनात

माणसांकडून चाललेली
माणूसकीची फरफट आहे
आपुलकीच्या नात्यातली
आपुलकीही झिरपत आहे

विचार बदलुन गेलेत सारे
वागणे सुध्दा बदललेत
माणसांच्या या जीवनामध्ये
अवगुण कुणाचे ओघळलेत,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - व्हाटस्अप इफेक्ट

Submitted by vishal maske on 8 August, 2015 - 10:24

व्हाटस्अप इफेक्ट

व्हाटस्अपच्या अति वापराने
कौटुंबिक संबंध चिरू लागले
अन् घटस्फोटांना कारणीभुत
म्हणे व्हाटस्अप ठरू लागले

प्रत्येकाच्या पाहण्याचे दृष्टीकोण
कुठे राइट कुठे लेफ्ट जात आहेत
अन् ज्याच्या त्याच्या वापरानुसार
व्हाटस्अप इफेक्ट होत आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - गेलेले दिवस

Submitted by vishal maske on 7 August, 2015 - 22:54

गेलेले दिवस

सुखासाठी तर कधी कुणाच्या
दु:खासाठीही नवस असतात
कधी चांगले तर कधी वाईट
जीवनामधले दिवस असतात

वाईट काळातील दिवस हे
पराकाष्टेनं रेटवले जातात
तर गेलेले दिवस मात्र
पुन्हा-पुन्हा आठवले जातात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - भक्ती,...!

Submitted by vishal maske on 7 August, 2015 - 10:16

भक्ती,...!

आहेत भक्त भोळे म्हणून
हवे तसे भुलवले जातात
भक्तांच्या भोळे पणावरच
कुठे उद्योग चालवले जातात

कित्तेक श्रध्देच्या ठिकाणीही
भोंदूगीरी सादरलेली आहे
वाढत्या दांभिक प्रकरणांमुळे
भक्ती मात्र भेदरलेली आहे,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - गाव गुंड्या

Submitted by vishal maske on 6 August, 2015 - 09:22

गाव गुंड्या

कुणी सहजच ठकले जातात
कुणी पैशांत विकले जातात
ग्रामपंचायती राजकारणात
टोलेजंग डाव टाकले जातात

कुणाचे डाव साधतात तर
कुणाचे डाव फसुन जातात
मात्र गावच्या गाव गुंड्या
निकालातंच दिसुन येतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पाणी

Submitted by vishal maske on 5 August, 2015 - 22:39

पाणी

प्रवाहा विरूध्द पोहण्याचे
निर्णय कधी गैर असतात
पाण्या मध्ये राहून कधी
पाण्याशीच वैर नसतात

पाणी जीवन असलं तरी
पाणी मरणही होऊ शकतं
जगण्या-मरण्याची साक्ष
पाणी सुध्दा देऊ शकतं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - तत्त्वज्ञान