कर्ज माफी,...!
विरोधकांनी विरोधही केला
तरीही जाग आलीच नाही
दूष्काळी परिस्थितीची जणू
सरकारला जाण झालीच नाही
कर्ज माफीचा मुद्दा वारंवार
सरकार कडून टळतो आहे
अन् कर्जाच्या बेरजेमध्येच
शेतकरी घूटमळतो आहे,.!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
भविष्य विद्यार्थ्यांचे
जिथे पोषक आहार मिळावा
तिथे विष प्रहार होतो आहे
विद्यार्थ्यांना विषबाधा होणे
हा प्रकार समोर येतो आहे
जेवनातुन विषबाधा होणे
असे प्रकारच घडू नयेत
ज्यांच्या हाती भविष्य आहे
त्यांचे भविष्य बिघडू नयेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
व्हाटस्अप वरून सदरील वात्रटिका इमेज स्वरूपात मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783
स्री
कायद्यात सुरक्षा असली तरी
वायद्यात मात्र घोटाळा आहे
स्री स्वातंत्र्याला ग्रासणारा
अत्याचाराचा वेटोळा आहे
स्री-पुरूष समतेच्या वल्गना
आता जणू डमी आहेत
स्री ला समजुन घेण्यासाठी
स्रीया सुध्दा कमी आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
सदरील वात्रटिका ऑडीओ मध्ये ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर 9730573783
विरोधी पक्ष
प्रत्येकाच्या हिशोबाच्याही इथे
वेग-वेगळ्या पुड्या असतात
राजकीय डाव साधत कधी
नव-नव्या कुरघोड्या असतात
सत्ताधार्यांवरतीही कधी-कधी
विरोधी वारे फिरलेले असतात
अन् विरोध करण्यासाठी मात्र
विरोधी पक्ष ठरलेले असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
लाच
कधी टेबला वरून असते
कधी टेबला खालुन असते
कधी-कधी न बोलताच तर
कधी-कधी बोलुन असते
दिली-घेतली जाणारी लाच
दोन्हीही बाजुने गुन्हा असते
कायद्यानं गुन्हा असली तरी
वास्तवात पुन्हा-पुन्हा असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
दुष्काळात
शेतातला एक-एक ठोंब
पाण्याविना पोरका आहे
या दुष्काळी पावसाळ्याचा
मना-मनाला चुरका आहे
निर्गालाच बाधक ठरणारा
कसा नैसर्गिक महिमा आहे
कर्जाळू जीनं जगता-जगता
दुष्ळात तेरावा महिना आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
जबाबदारांनो
ज्यांची आपुलकी वाटायला हवी
त्यांचाही तिरस्कार वाटू लागेल
जेव्हा कोणी जबाबदार नागरिक
अमाणूषतेनं लोकांना पिटू लागेल
कायद्याने अधिकार असले तरी
अधिकाराने कायदा वागवु नये
अन् जबाबदार्या पार पाडताना
आपली संयमी काया धगवु नये
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
आधार
याचा त्याला आधार असतो
त्याचा याला आधार असतो
आधार देता-घेताना कधी
आधार हाच गद्दार असतो
मना-मनातुन मना-मनावर
घाता-पाताचा वार नसावा
विश्वासानं दिला घेतलेला
आधार कधी गद्दार नसावा
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
शेतकर्याची व्यथा
वेग-वेगळ्या विचारांनुसार
अधिवेशनं सजले जातील
शेतकर्याचे प्रश्न मांडणारेही
अधिवेशनात गाजले जातील
नावाला पावसाळी असलं जरी
पावसाचा अजुनही पत्ता नाही
अन् दुष्काळात होरपळला तरीही
शेतकर्याला दुष्काळी भत्ता नाही
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
बहिष्कृत चहा-पान
आपुलकीच्या निमंत्रणाला
तिरस्कारीत संगत असते
अन् अधिवेशनीय चहापान
दोन्ही बाजुने रंगत असते
विरोधकांची विरोधी काया
नाराजीतही प्रविण असते
बहिष्काराची ही रीत जुनी
पालवी मात्र नविन असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३