हतबलता,...
पळून-पळून थकले जातात
हरलेला डाव कळून घेतात
जेव्हा उपलब्घ पळवाटाही
परिस्थितीपुढे पळून जातात
परिस्थितीचे गांभिर्य पाहून
चहूबाजुनेच फेटाळलं जातं
तेव्हा मात्र उम्मीद सोडून
हतबलतेला कवटाळलं जातं
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
जाती-धर्म
मना-मनात वाढणारी
जाती-धर्माशी आपुलकी असते
जाती-धर्मीयांचा पुळका
हि गोष्टही शेलकी असते
ज्याच्या-त्याच्या संस्कारानुसार
ज्याच्या-त्याच्या शिस्त असतात
मात्र कर्तृत्ववान माणसं कधीच
जाती-धर्मात बंधिस्त नसतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
निमित्त एकादशीचे
अंत:करणातल्या भक्तीचा
हा आनंद उतप्रोत असतो
मनी समाधान लाभण्याचा
हा अध्यात्मिक स्रोत असतो
हलक्या-फुलक्या अन्नासाठी
उपवास निमित्त ठरला जातो
अन् पोट भरेपर्यंत फराळावर
मनसोक्त ताव मारला जातो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
पुळके
प्रसिध्दी मिळविण्यासाठी
उगीचंच त्यांचे स्टंट असतात
पण सांगा त्यांनाही कुणीतरी
शेळ्या हाकण्या उंट नसतात
मना-मनामध्ये माजलेले
अविचाराचे घोळके असतात
अन् नको असलेल्या गोष्टींचेही
कुणा-कुणाला पुळके असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कान पिचक्या
ज्याच्या-त्याच्या हाती इथे
वेग-वेगळे शस्र आहेत
प्रत्येकाच्या वापराचेही
वेग-वेगळे शास्त्र आहेत
जशी ज्याची आठवण येईल
तशा त्याच्या गुचक्या असतात
खोचक शब्दांचा वापर करत
कधी कान पिचक्या असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
माती प्रेम
शेतकर्याच्या आत्महत्येचेहीे
वेग-वेगळे तर्क-वितर्क आहेत
मंत्र्यांच्या बोलण्यातुन दिसते
कोण किती सतर्क आहेत,.!
बोगस कारभार हाकण्यापेक्षा
किसानी जगणं जगुन बघा
मातीवरचं प्रेम काय असतं ते
एकदा मातीतंच येऊन बघा
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
आमचा सल्ला
इतरांचं जरी जळलं तरीही
न जळणाराला कळत नसतं
ज्याला-ज्याला कळत असतं
केवळ त्याचंच जळत असतं
परिस्थितीचे गांभिर्य घेऊन तरी
रासवट काया कापरली जावी
अन् आकलेचे तारे तोडताना
थोडीशी अक्कल वापरली जावी
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
गदारोळ
ज्याचा आवाज मोठा त्याच्या
बोलण्यामध्येही जोर असतो
नसतं कधी-कधी दिसतं तसं
साव वाटणाराही चोर असतो
पण चोर असो की साव असो
सिध्दतेसाठी तर घोळ असतो
अन् चोरा बरोबर कधी-कधी
सावाकडूनही गदारोळ असतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
फिल्मी रेकॉर्ड
कुणी तरी बनवुन जातो
बाकीचे मग मोडत बसतात
वेग-वेगळ्या कमाईने
नवा रेकॉर्ड जोडत असतात
कुणी दुसर्याचे तर कुणी
स्वत:चेच तोडत असतात
पण त्यांचे रेकॉर्ड घडवण्यासाठी
प्रेक्षकच धडपडत असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
नीती
जसे माणसं बदलतील
तसे विचार बदलले जातात
आपल्या सोयीचा विचार करत
स्वार्थी मनं सादळले जातात
कटू नीतीचा वापर करत
लोक इथले भुलवले जातात
अन् महत्वाचे कार्यालयंही
इकडून तिकडे हलवले जातात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३