ऋतुवेद

वेगळी राधेहूनि..

Submitted by rutuved on 25 August, 2016 - 08:30

ती बेधुंद
कधी शांत
कधी मुग्ध तपस्विनी...

तो शल्य
कधी रुक्ष
कधी मोह वृंदावनी..

एकांत
कधी सारथी
कधी अश्व मुक्त वनी..

सामर्थ्य
कधी पोरके
कधी तप्त विस्तवाहूनि..

बासुरी
कधी अर्थ
कधी साद विरक्त सांजेपरी..

शब्द
कधी भावना
कधी आर्जवं आत्म्यातूनी...

ऋतुवेद

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ऋतुवेद