संस्कृती

हिन्दू पद पादशाही : पानिपत & Beyond

Submitted by Silent Banker on 7 February, 2020 - 12:46

नवीन दशक चालू होण्याच्या उंबरठयावर जे अनेक बदल आपण पाहतो आहोत त्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे गेल्या दशकातील तंत्रज्ञानाने उत्तम सेवा( Excellent Customer Service ) देणारी संसाधने( Resources ) हाती दिल्यानंतर माणसाचा प्रवास हा ते वापरून आपले जीवन समृद्ध करण्याकडे चाललेला दिसतो। त्यातील परवालीचा शब्द म्हणजे जीवनाभुव ( Life Experiences ).

औरत की हँसी / सरिता स्निग्ध ज्योत्स्ना

Submitted by सामो on 5 February, 2020 - 11:19

मध्यंतरी कविताकोष साईटवरती एक कविता वाचनात आली होती . तिचा मतीतार्थ हा होता की स्त्रियांवरती जे अत्याचार होतात, त्यांना जखडून ठेवलं जातं ते काही नवीन नाही. फार पूर्वापार ही परंपरा चालत आलेली आहे. अर्थात काही ठळक उदाहरणे उदा - सीतात्याग माहीत आहेच परंतु द्रोपदीचे देखील 'हसणे'.
या हसण्यातून महाभारत घडले - अंध राजाचे पुत्रही अंध असतात हे माहीत नव्हते असे काहीसे उद्गार तिचे होते असे वाचल्याचे स्मरते.
हे वाक्य की एका स्त्रीमुळे महाभारत घडले हेच मुळी खटकण्यासारखे आहे.

सानुला, सुंदर आणि सुटसुटीत

Submitted by साद on 4 February, 2020 - 08:24

स्थळ : एका शहरातील उद्यान
वेळ: असाच एक रविवार, सकाळी ९ वाजता
हवामान : निरभ्र आकाश आणि सुखद वातावरण

या उद्यानात साधारण शांतता आहे. तुरळक लोकांची येजा चालू आहे. एवढ्यात एका बाजूने काही लोक शिस्तीने आत प्रवेश करतात. हे एकूण २४ जण आहेत. या सर्वांचेच पोशाख सामान्य आहेत. त्यांच्या बरोबर ते ६ सतरंज्या घेऊन आलेले आहेत. आता त्या अंथरल्या जातात. मग समूहातले २२ जण त्यावर बसतात. आता फक्त दोघेजण उभे आहेत- त्यातला एक ‘तो’ आणि दुसरी ‘ती’ आहे. आता पुढे काय ? तर आज इथे त्या दोघांच्या लग्नाचा हा छोटासा मेळावा आहे.

शब्दखुणा: 

शर्टाचे रंगांतर

Submitted by BLACKCAT on 24 December, 2019 - 05:02

नेट वरून एक शर्ट मागवला, तिथे चित्रात हिरवा दिसला,
पण आला तर निळा.

unnamed_0.png

त्याला हिरवा कसा करणार ?
शेवटी कुकरमध्ये हळद उकळून त्यात तो शर्टही उकळून काढला

नवीन अनुभवांसाठीची स्वीकार्यक्षमता

Submitted by राधानिशा on 31 October, 2019 - 15:17

गेम ऑफ थ्रोन्स हेटर्स क्लब धाग्यावर एका ताईंनी " भंगार वाटलं , एक - दोन मिनिटं पाहून बंद केलं " अशी प्रतिक्रिया दिली आहे .. त्यावरून विचारचक्र सुरू झालं .. यातले बरेचसे विचार आधीही येऊन गेले होते पण या निमित्ताने शब्दात उतरवून काढावेत , आपले आपल्याला स्पष्ट होतील आणि इतरांसमोरही मांडता येतील असं वाटलं ..

1 - 2 मिनिटात एखादी गोष्ट भंगार ठरवणं किंवा सौम्य शब्दात आपल्याला ही गोष्ट आवडणारच नाही असं ठरवणं कितपत योग्य आहे ?

शब्दखुणा: 

पुण्याचं हे न ते: भाषा

Submitted by नीधप on 20 October, 2019 - 23:57

हे पुणेरी भाषेचं प्रकरण काय आहे? मला माहिती असलेल्या पुण्यात फक्त पुण्यापुरतीही प्रमाण भाषा नाही. महाराष्ट्राचे राहूच द्या.

शब्दखुणा: 

हिमनग आणि सोळा वर्षे (लंडन १)

Submitted by Arnika on 16 October, 2019 - 03:29

Cultural iceberg.jpg
“काय गो, भाताचं काय करता तिकडे? आपला उकडा तांदूळ मिळतो का परदेशात?” लंडनहून पहिल्यांदा रत्नागिरीला गेल्यावर एका काकूंनी विचारलं.
“नाही, बासमती मिळतो.” मी त्यांची काळजी दूर करायच्या हेतूने म्हणाले, पण झालं उलटंच!
“मेलीस! रोज तो लांबलांब दाणा खायला लागतो की काय?” त्या ओरडल्या.
कोकणातला तांदूळ लंडनमध्ये मिळत नाही तो नाहीच, वर पोरीला रोज अख्खा बासमती खाऊन दिवस काढावे लागतायत म्हणजे परांजप्यांवर भलताच प्रसंग गुदरलाय असं वाटून काकूंना आमची फार दया आली होती त्यवेळी.

तांदळाची बोरं, विथ सम गपशप

Submitted by 'सिद्धि' on 14 October, 2019 - 12:24

' आजकाल धावपळीच्या युगात दिवाळीचा फराळ घरी करणे म्हणजे फारच अवघड काम. बाजारात वेगवेगळ्या दरांमध्ये हेच पदार्थ सहज उपलब्ध आहेत, त्यामुळे सध्या विकतचेच गोड मानुन दिवाळी साजरी करण्याचा ट्रेंड आहे . पुर्वी घरच्याघरीच ४-५ पदार्थ तरी सहज बनवले जायचे आणि एवढ करुन देखिल ' यंदा जास्त काही करता आल नाही हो.. ' अशी खंत मनात बाळगणार्‍या गृहीनी अश्या फराळाच्या रंगतदार गोष्टी चविचविने सांगत. आजकालच्या स्त्रिया घर आणि ऑफीस दोन्ही सांभाळताना तारेवरच्या कसरती प्रमाने जीवनाची कसरत करत जगतात, तर हे सगळे पदार्थ करण्यासाठी आपल्याकडे किती वेळ असणार म्हणा ....

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - संस्कृती