एका नगरात एक गुरु राहत होते........

सर्वाभूती नारायण

Submitted by मिरिंडा on 23 June, 2016 - 10:28

एका नगरात एक गुरू राहत होते . त्यांचे अनेक शिष्य होते. महोक्ष नावाचा त्यांचा एक आवडता शिष्य होता. शिक्षण पुरे झाल्याने त्यांनी त्याला घरी जाण्याची अनुज्ञा दिली. जाण्यापूर्वी त्यांनी शिष्यांना उद्देशून भाषण केले. " माझ्या लाडक्या शिष्यांनो हे लक्षात ठेवा की सर्वाभूती नारायण आहे आणि त्याचा आदेश पाळला पाहिजे. ही साधना तुमची पुरी झाली आहे. आता आयुष्यातले अनुभव त्यानुसार घ्यावेत हे लक्षात ठेवा. " सर्वांनीच होकार भरला. महोक्षाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी त्याला भावी आयुष्या बद्दल आशीर्वाद दिले. तो जायला निघाला. त्याचा रस्ता एका जंगलातला होता.

Subscribe to RSS - एका नगरात  एक गुरु राहत होते........