माराल काय तुम्ही तयांना

माराल काय तुम्ही तयांना ......

Submitted by मिरिंडा on 9 June, 2016 - 03:54

माराल काय तुम्ही तयांना
हाती त्यांच्या समशेर आहे
हात तुमचे बांधलेले
क्षमा याचनेची आर्जव आहे

निः शब्द मौनता तुमची
कमाल आहे भ्याडपणाची
त्यांनी किती कुरापती काढल्या
परी षंढ तुमचा जागा आहे

लाज असे तुमची तुम्हाला
सभ्यतेतही भीड भरली
काय तुम्ही कराल सामना
अशा जनांचा वा मनाचा

Subscribe to RSS - माराल काय तुम्ही  तयांना