'मायबोली गणेशोत्सव २०१५

बाप्पा इन टॉप गिअर - मी_केदार - अहना- वय ४ वर्ष ११ महिने

Submitted by मी_केदार on 19 September, 2015 - 03:05

पहिल्यांदाच भाग घेतलाय लेकीने गोड मानून घ्या Proud
बाप्पा रंगवण्या बद्दल बोलायचं तर लेक म्हणतेय "फक्त बाप्पा रंगवायल सांगितलाय ना ! आजुबाजूचं कलर करायचं नाही Lol

तेचबुक! स्टेटस गिर्‍या - आयफोन ६स

Submitted by केदार on 18 September, 2015 - 04:11

गिर्‍या स्टेटस : न्यु टॉय इन द टाऊन - आयफोन 6S. काल रात्रभर लाईनीत उभा राहून आयफोन ६S मिळवला. य्येस! #Iphone6S #Goodtimes #Firsttoget #Haapy #intheclouds

लाईक्स सत्या,सुन्या, मोहन, रावडी राठोड, दंबग मन्या, केतकी, रेवती,मेघना अ‍ॅन्ड २७ मोअर.

रावडी राठोड : अबे गिर्‍या, रात्रभर जागून, लाईनीत उभा राहून फोन घेतलास, त्यापेक्षा TEला तेवढा अभ्यास केला असतास तर पास झाला असतास. Proud
गिर्‍या : राठोड, इथे पास होण्याचे काय आहे? आज बघ मी अमेरिकेला आहे. BE न काढताच.आणि तू बसलास तिथेच.

बाप्पा इन टॉप गिअर- श्रीशैल - ७ वर्षे

Submitted by इंद्रधनुष्य on 18 September, 2015 - 00:31

मायबोलीचा बाप्पा आहे म्हंटल्यावर श्रीशैलने अगदी आनंदाने रंगकाम सुरु केलं.

150916145807_0001.jpg

बाप्पा इन टॉप गिअर- यश-६वर्षे-साती

Submitted by साती on 17 September, 2015 - 11:31

हा माझ्या लेकाने केलेला प्रयत्न!
माध्यम- क्रेयॉन्स.
शेडींग बिडींग सगळं काही फक्तं हातानेच.
image_49.jpg

विषय: 

बाप्पा इन टॉप गिअर - स्निग्धा - पाल्याचे नाव - आर्या - वय वर्ष - ७

Submitted by स्निग्धा on 17 September, 2015 - 08:50

Ganesh.jpg

गणपती बाप्पा मोरया Happy

आमच्या गणपतीच्या डोक्यावर काही पक्षी सुध्दा उडताहेत बरं का Lol

विषय: 

आरोग्याचा श्रीगणेशा!

Submitted by संयोजक on 17 September, 2015 - 06:46

नमस्कार!

मायबोलीवरचा गणेशोत्सव म्हणजे धमाल, मजा आणि मस्तीच्या कार्यक्रमांची नुसती रेलचेल असते. मायबोलीकर जितक्या उत्साहाने या सर्व उपक्रमाची मजा लुटतात तितकेच ते आहार, व्यायाम, कायदे, चालू घडामोडींविषयी जागरुकही असतात. गेल्या वर्षी बाप्पांनी आपल्याला स्वतःची, आपल्या कुटुंबाची सुरक्षा जपण्यासाठी काही कानमंत्र दिले होते, लक्षात आहे ना? याही वर्षी बाप्पा या धाग्यावर आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, आरोग्याबद्दल! बाप्पासारखेच सुपाएवढे कान करुन ऐकूया! चला, तर मग करुया , निरामय आरोग्याचा श्रीगणेशा! गणपती बाप्पा मोरया!

ज्युनिअर चित्रकार - माझी खोली - नचिकेत - मायबोली आयडी पूनम

Submitted by संयोजक on 17 September, 2015 - 01:19

मायबोली आयडी - पूनम

पाल्याचे नाव - नचिकेत

विषय: 

'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.३ : मद्रासी सांबार कांद्यांची कलेजी

Submitted by संयोजक on 15 September, 2015 - 06:11

कांदा, बटाटा, टोमॅटो कोथिंबीर, गरम मसाला, धने-जिर्‍याची पूड इत्यादी हाताशीच असणारं साहित्य... हे पाककृतीत घालायचा क्रम थोऽडा बदलला की चवीतही काय मस्त फरक पडतो.

अशीच वेगळ्या चवीची आणि पटापट होणारी छोट्या मद्रासी सांबार कांद्यांची ही कलेजी.

साहित्य -
सांबार कांदे - वीस ते पंचवीस (साधारण २०० ग्रॅम)
मोठा टोमॅटो - एक
उकडलेले बटाटे - दोन
मूठभर स्वच्छ धुऊन बारीक चिरलेली कोथिंबीर
फेटलेली साय - अर्धी वाटी
तूप - दोन मोठे चमचे
मसाले -
गरम मसाला - एक चमचा
धने पूड अर्धा चमचा -
जिरं पूड - एक चमचा
कांदा लसूण मसाला - अर्धा चमचा
गोडा मसाला - पाव चमचा
मीठ, साखर चवीप्रमाणे

मायबोली गणेशोत्सव २०१५ स्पर्धा - तेचबूक! -प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत!

Submitted by संयोजक on 15 September, 2015 - 01:40

गणपती बाप्पा मोरया!

सोशल नेटवर्किंग हा शब्द सध्या मायबोलीसारख्या संकेतस्थळांपुरता मर्यादित राहिलेला नसून फेसबूक, ट्विटर वगैरेंच्या उल्लेखाशिवाय तो अपूर्ण आहे. हल्ली टीव्हीवरही ब्रेकिंग न्यूजमध्ये कुण्या प्रसिद्ध व्यक्तीने त्याच्या फेसबूकवर, ट्विटरवर काय विधान केलं, त्याचे काय पडसाद उमटले याचीही चर्चा असते. चटपटीत गॉसिपसाठी लोकांना हे एक नवीन खाद्य मिळालेलं आहे. हीच संकल्पना वापरून आपण यंदा मायबोलीवर गणेशोत्सवात धमाल करणार आहोत.

मायबोली गणेशोत्सव २०१५ - उपक्रम "रंगरेषांच्या देशा - चित्रकला" - प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत!

Submitted by संयोजक on 14 September, 2015 - 03:51

आपल्या मायबोलीवर वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतात. त्यातील 'जलरंगाची कार्यशाळा' ह्यावरून आम्हाला हा उपक्रम सुचला. दरवर्षी लहान मुलांसाठी चित्र रंगवणे हा उपक्रम होतोच, ह्या वर्षी आम्ही ही संधी मोठया मायबोलीकरांनासुद्धा देत आहोत.

उपक्रमाविषयी -

१) हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.

२) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांकरताच आहे.

३) उपक्रमात सहभागी होण्यासाठी मायबोलीचे सभासदत्व असणे आवश्यक आहे.

४) उपक्रमासाठी वयोगट १५ वर्षे व पुढे आहे.

५) चित्र हाताने काढून रंगवलेले असावे. जलरंग, अ‍ॅक्रिलिक, ऑइल, पेस्टल, कलर पेन्सिल असे कुठलेही रंग वापरता येतील.

६) चित्रासाठी विषय -

विषय: 

Pages

Subscribe to RSS - 'मायबोली गणेशोत्सव २०१५