#आयुष्य#बदल

Compliment

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 2 May, 2018 - 21:24

“ममा, तू किती छान दिसतेस”
सकाळची कामं आवरून येऊन माझ्या २ वर्षाच्या लेकाला खाऊ खायला देताना माझा लेक म्हणाला.
इतकं मस्त वाटलं... मी काही आपण बाहेर जाताना आवरतो तसं आवरलं नव्हतं. उलट घरातलेच कपडे, सकाळी गडबडीत आवरल्यावर बांधलेला अंबाडा अशा काहीशा अवतारात होते मी. पण त्याच्या नजरेत मी, त्याची आई सुंदर होते. किती छान होती ती जाणीव.
मग वाटलं कित्येकदा एक साधी compliment एखाद्या माणसाचा दिवस छान बनवू शकते ना?

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - #आयुष्य#बदल