ईच्छा

ईच्छा

Submitted by abhishruti on 16 January, 2015 - 09:57

एक काळ असा होता की मला तुझं प्रेम उमजत नव्हतं
आता वेळ अशी आहे की ते उमजून्ही मी काय करु?
समाजाला तू कधी मानलं नाहीस, आणि मी कधी डावललं नाही.
पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलं, नाही
खरंतर पूलच वाहून जायची वेळ आली
आता दुरुनच एक्मेकांना पहायचं, अगदी पूर्ण डूबेपर्यंत
कोणकोणाला आधार देणार आणि कशासाठी हा अट्टाहास?
डूबताना देखील ही माणसं मला तुझा हात धरु देणार नाहीत
आणि मला नाही सहन होणार तुझ्या डोळ्यातली अगतिकता
निदान जाताना तरी मला तुझ्या डोळ्यातलं निखळ प्रेम अनुभवायला मिळाव
एव्हढीच ईच्छा.....

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ईच्छा