पल्ली

मतलबी बगळा

Submitted by पल्ली on 11 January, 2015 - 02:38

पाणी जेवढं संथ शांत
तेवढं खोल असतं म्हणे..
असेना का, मला काय त्याचं?
खोल असो उथळ असो
मला पाण्याशी मतलब
आणि
पाण्यातल्या माशांशी..
मतलबी कोण नसतं?
सांगा ना??
तर...
मीही एक मतलबी बगळा.
तर काय!
मीही होते ना कधी काळी
सर्वांसाठी नेहमीच तत्पर.
मला काय मिळालं?
सांगणं अवघड आहे..
कशाचं सोयर सूतक नाही.
आताशा मी खूपच शांत असते,
खोल खोल अथांग.....
एक पाय पोटाशी घेऊन
मीही उभी असते वाट पहात
साधु संत पणाचा आव आणणार्‍या
शुभ्र निर्लज्ज बगळ्यासारखी...
संधी साधू मतलबी

शब्दखुणा: 

देहाचा गाभारा

Submitted by पल्ली on 11 January, 2015 - 02:25

मनाच्या झरोक्यातुन आठवणींचा एक किरण
सुंदर नाजूक तेजस्वी!
डोकावतोय देहाच्या गाभार्‍यात..
एका अचेतन देहात
चेतनेचा प्रवेश.
सोबत आहेतच
काही उपद्रवी पण क्षुल्लक धुलिकण..
पण त्या धुलीकणांनाही
किरणांनी तेजाची झळाळी दिलीय.
सारं कसं छान भासतंय.
आठवणींच्या किरणांचा
एक झिरझिरीत कवडसा
ऊमटला डोळ्यांच्या
नितळ आरश्यात...
एक क्षणभर..
अगदी क्षणभर
एक प्रकाशाची दिव्य शलाका
नजरेत ..
आरश्यावर अनाहूत
वादळी पावसाचं आक्रमण..
थेंब थेंब वहात जातायत..
अन मग

शब्दखुणा: 

मी अश्वत्थामा

Submitted by पल्ली on 11 January, 2015 - 02:14

पायाखाली जमीन नाही
अन नाही वर आकाश
झुरतो घेऊन मी अश्वत्थामा
मम मस्तकावरी दुखरा डाग...
पाषाणी फुलतील फुले
वाळवंटी फुटतील झरे
परि लिहिली नाही मुक्तता
मम दुर्दैवी प्राक्तनात...
आयुष्याच्या चक्रावरती
फिरतो आहे अनंत अनादी
वरदान म्हणू मी अमरत्वाचा
कि हा मजला दिधला शाप...
पृथ्वीवरती दुर्लभ सारे
विषण्ण सारे निळे आकाश
अधांतरी मी अगदी एकटा
शोधीत फिरतो सुख उ:शाप...

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - पल्ली