समिक्षा

अग्ली..? पण कोण ? - चित्रपट

Submitted by ऋग्वेद on 27 December, 2014 - 07:37

अग्ली म्हणजे विकृत, ओंगाळवाणा. हा चित्रपट मानवी वृत्तीच्या अत्यंत खालच्या थराचे वास्तव दाखवुन देतो. माणुस स्वार्थासाठी कोणत्याही थरावर जायला तयार होतो. इतका की आपल्याच पोटाच्या गोळ्याला देखील कचर्यात फेकुन द्यायला तयार होतो. मनाच्या तनाच्या सुखाकरीता कशाचाही बळी घेण्याची लालसा जागृत होते. बस मी माझे माझ्याकरीता. अजुन काहीच नाही. प्रत्येक मनुष्याच्या मनाच्या एका काळ्या कोपर्‍यात लालसा स्वार्थ नावाचा दैत्य लपुन बसलेला असतो. संधी मिळताच आपल्यावर तो हावी होउन मनुष्याकडुन नको ते कृत्य करुन घेतो. आणि त्यात जर पैसा असेल तर मग बघायलाच नको. तो दैत्य आपल्या छाताड्यावर नंगानाच करतो.

विषय: 
Subscribe to RSS - समिक्षा