साहित्य मधे

स्वप्नरिक्त

Submitted by भुईकमळ on 6 November, 2014 - 04:41

आता फक्त भास
सोबतीला उरे
कुठे शब्दझरे
झाले लुप्त..॥१॥

कशा उजळाव्या
मंद प्राणवाती
पापणीच्या काठी
अश्रुराग ...॥२॥

लाटाळली रात्र
कशी यावी नीज
बैचेनीची गाज
काळजात॥३॥

नाही बघायचे
पुन्हा पुन्हा मागे
गाव पाठी जागे
हुंदक्यांचे .॥४॥

अंधारपालखी
फांद्या पेलतात,
पाने पोळतात
काजव्यांनी..॥५॥

Subscribe to RSS - साहित्य  मधे