अमेरिकेत कार रेंटल संबंधी माहीती हवी आहे.
माझे सासू सासरे आणि नणंद यायच ठरवतायत, त्यामुळे त्याना आसपास /दूर फिरवण्यासाठी ७ सीटर वाहनाची गरज लागणार आहे.महीना भरा साठी अशी गाडी रेंट करणं किवा विकेंड्स ना रेंट करण्याचा विचार करतोय, पण नेट वरून रेट काढले तर दिवसाला ७०-८० $ कमीतकमी होतील असं दिसतय.याशिवाय मायलेज/टॅक्स्/इन्शुरन्स वैगरे वेगळ होईल.
कुणाला लॉग टर्म रेंटल / किवा डिस्काऊंट्स असलेली कार रेंटल्स माहीती आहेत का?
तसंच नॉर्थ कॅरोलीना मधून नायगरा/न्यूयॉर्क्/डीसी ई. तरी कमीत कमी त्यांना पाहायचय. अशा टूर्स असतात का?(एकटेच फिरून या असं म्हणण बरोबर वाटत नाहीये पण निदान एखाद्या ठिकाणा साठी जरी सोय झाली तर...)