मायबोली

मायबोली या संकेतस्थळाबद्दल माहिती

माझा La carte मेन्यू

Submitted by अस्लम बेग on 8 October, 2019 - 11:03

जीवनात कायम दुःखी असेल अशी व्यक्ति सहसा असुच शकत नाही कारण येणारे सुख काय किंवा दुःख काय, दोन्हीही असतात क्षणभंगुर ! कारण दोन्हीचे अस्तित्व अवलंबून असते ते फक्त क्षणागणिक बदलत राहणाऱ्या चार गोष्टींवर ― आहार, विहार, आचार, विचार. माणसाच्या चंचल मनामुळे जेव्हा कधी सुख मिळते तेव्हा त्या क्षणांचे सातत्य राखणे आणि ज्याचे परिणाम म्हणून सुख अनुभवले त्या कृतीचे अवलोकन करणे बहुतांश वेळा अवघड होऊन बसते. आणि अश्या दोलायमान स्थितीमुळे आणि नेमके विपरीत कृतीचे आचरण घडल्याने मनाला पुन्हा एकवार दुःख भोगावे लागते. मग ह्यावर उपाय काय ?

एक्स्ट्रा इनिंग

Submitted by अस्लम बेग on 28 September, 2019 - 03:45

उत्तर ध्रुवाच्या थोडं दक्षिणेकडे जगाच्या नकाशावर 'लीबोयमा' नावाचा एक छोटासा देश होता. या देशाचे आद्य नागरिक उच्च अभिरुचीचे आणि चतुरस्त्र का काय ते म्हणतात तसे होते. त्यांनी अनेक चांगले पायंडे पाडले, स्पर्धा आणि उत्सव सुरु केले. चेंडूफळीचा खेळ इथे मोठ्या उत्साहाने खेळला जायचा. एकंदर फार भारलेले वातावरण होते. या भारलेल्या वातावरणात अनेक व्यक्तिमत्वे फुलली. अनुभवसंपन्न झाली. इथल्या मैदानात खेळून खेळून अनेक खेळाडू नावारुपाला आले.

मायबोली गणेशोत्सव २०१९ समारोप.

Submitted by संयोजक on 18 September, 2019 - 01:16

नमस्कार मायबोलीकरहो,
मायबोली गणेशोत्सवाचे हे यंदाचं २० वे वर्ष. जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले मायबोलीकर ज्यांना इच्छा असूनही गणपतीत घरी जाता येत नाही अश्या सर्वांसाठी अगदी आपला घरचा उत्सव. उत्सव ऑनलाइन असला तरी यात आरत्या होत्या, पंचपक्वान्नांचा नैवेद्य होता, आरास सजलेली, विविध उपक्रम होते, पानाफुलांच्या रांगोळ्या सजल्या, स्पर्धा झाल्या. उत्सवात मायबोलीचं वातावरण पण एकदम उत्साहपूर्ण असते आणि म्हणूनच नेहमी उत्सव दणक्यात होतो.

सोळा आण्यांच्या गोष्टी- सोबत-मन्या ऽ

Submitted by मन्या ऽ on 15 September, 2019 - 02:07

सोबत...

ती मोठ्मोठ्यानं हाका मारत होती..
"थांबा.. थांबा.. मला नाही राहायचं इथं.."

"मलाही यायचंय तुमच्यासोबत.."

"प्लीज.. मला ईथे एकटीला सोडुन जाऊ नका"

ती रडत रडत आपण कुठे आहोत हे समजण्याचा प्रयत्न करत असते..

नव्या ठिकाणी घाबरलेली ती तिथेच ग्राऊंडवर एका झाडाखाली ग्लानीत झोपी जाते..

आणि इकडे घरी
तिला झोपेतच दरदरुन घाम फुटलेला असतो..

ती झोपेतही बडबडतीये..
"मला नका इथे सोडुन जाऊ"

"मला नाही राहायचं इथे.."

सोळा आण्याच्या गोष्टी - इजा बिजा...- कविन

Submitted by कविन on 12 September, 2019 - 13:02

गॅलरीत कावळा कधीचा केकाटत होता. "आता नको रे बाबा कोणी पाहुणा!" म्हणत ती उठायला गेली तर ओल आलेल्या फरशीवरुन तोलच गेला.

आज काही खरं नाही सकाळी पायऱ्यांवरुन पडत होते. इजा झालं बिजा झालं, मन परत अस्वस्थ झालं. तिने मूड बदलायला रेडीओ सुरु केला.

"तू जहां जहां चलेगा मेरा साया.." स्वरांनी कानाला हलकेच स्पर्श केला. हेच गाणं का? तिला अजूनच अस्वस्थ वाटायला लागलं. चॅनल बदलून ती दिवा लावायला उठली.

सोळा आण्याच्या गोष्टी - घटनाक्रम - कविन

Submitted by कविन on 12 September, 2019 - 01:16

घटना घडत गेल्या, क्रम काहीही असेल याचा.

थांब ॲडम! ती विनवणीच्या स्वरात म्हणाली. माझा श्वास थांबला एक क्षण.

त्या बंद दारापलिकडे म्हणे सैतानाचे राज्य आहे आणि कसलेसे संस्कार केलेल्या मंतरलेल्या धाग्याने म्हणे त्याला रोखून धरलय. बूलशीट! या अंधश्रद्धेलाच मला तोडायचे आहे.

तिच्या म्हाताऱ्या हाताचा खरखरीत स्पर्श गालाला झाला. फूल पडलेल्या डोळ्यातून अश्रू तिच्या गालावर ओघळले.

“ती सैतानाची खोली आहे. त्याला बाहेर येऊ दिला तर अनर्थ होईल. काळजी वाटते रे मला तुझी” ती कळवळून म्हणाली.

म्हातारी सरणावर गेली. मी दोर कापून टाकला. दार उघडले. खोल भरून श्वास घेतला.

सोळा आण्याच्या गोष्टी - नशीब - sonalisl

Submitted by sonalisl on 11 September, 2019 - 16:21

“तुमचं नक्की ठरलंय ना? तुम्ही एकमेकांच्या आठवणी पुसून टाकाल पण लोकांचे काय? ते तुम्हाला विसरणार नाहीत.”
“मी हे शहर सोडून जाणार आहे” ती म्हणाली आणि त्यांनी संमतीपत्रावर स्वाक्षरी केली.

या उपचाराने त्यांच्यातली मैत्री, प्रेम, अोढ, एकत्र पाहिलेल्या स्वप्नांबरोबर समज, गैरसमज, राग, दुरावा, कडवटपणा सगळेच संपणार होते.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

शब्दखुणा: 

सोळा आण्याच्या गोष्टी - अस्तित्व - sonalisl

Submitted by sonalisl on 11 September, 2019 - 08:57

“येना, बस. आपल्यासाठी मस्तपैकी कॉफी करते” असे बोलून ती आत गेली.
काही दिवसांपूर्वीच आमची ओळख झाली होती आणि आज पहिल्यांदा मी तिच्या घरी आले.
टेबलावर-भिंतींवर रेघोट्या, कोप-यात पुस्तकांचा ढिग, फूटकी पाटी, दरवाज्यांवर रंग, तूटका लँप शेड बघून वाटले.. हि नीटनेटकी दिसते मग घर का असे ठेवले आहे? जरा चकचकीत केले तर छान दिसेल. जाऊ दे, आपल्याला काय करायचे!
ती कॉफी घेऊन आली. गप्पा पुन्हा सूरु झाल्या.
“अगं सेम अस्साच लँप शेड मी लाईट पॅलेस मधे पाहिला होता. तुला बदलायचा असेल तर मिळेल तिथे.”

शब्दखुणा: 

सोळा आण्याच्या गोष्टी - 'सावली' - रागिणी

Submitted by राग on 11 September, 2019 - 02:34

हो ! माझं नावच आहे ते ... सावली. कारण मला स्वतंत्र अस्तित्व कधीच नव्हते आणि कदाचित पुढेही नसणार. तरीही मी जगतेय अन् जगत आलीय. तसं माझं वय फार नाही पण लोक म्हणतात की मी यंदा ७२ वर्षाची झालेय. अजुन किती काळ जगणार माहीत नाही पण ही आजुबाजूची मंडळी माझी इतकी काळजी घेत असतात की मला तर कधीकधी वाटून जाते मी अमर होणार. माझंसुद्धा सर्वांवर सारखेपणाने लक्ष असतं बरं का ! मी नाही कधी जातपात मानत, त्यामुळे भेदभाव करायला कधी जमलाच नाही. शेवटी भूक सर्वाना सारखीच असते ना ! कोणाची अन्नाची, पैशाची तर कोणाची वासनेची. जी रूपं घेऊन येईल तिची मी सावली... मालकाच्या भावनेवर विसंबलेली !!

शशक-करिअरभृण हत्या

Submitted by Cuty on 9 September, 2019 - 08:12

बारावीचा निकाल! 64टक्के. खोलीत ती मलूल होऊन पडली होती.
बाहेर आईच्या डोळ्यात पाणी, 'कसं फसवलं बघा पोरीनं. हुशार आहे, ईंजिनीअरिंग करायचं म्हणून जेवायचं ताटसुध्दा उचलू दिलं नाही. खोलीतून बाहेर येऊ दिलं नाही. सगळं जागेवर. तुम्हीच सांगा.'
'नशिबच फुटकं!', वडिल.
'अहो बीसीएसला नक्की अडमिशन मिळेल', एकजण.
'हो खड्ड्यात गेलं ईंजिनीअरिंग!!' वडिल उद्विग्न.
सर्वजण पांगले!

Pages

Subscribe to RSS - मायबोली