अवांतर

माझी पुणेरी पाटी...!!!

Submitted by MallinathK on 1 February, 2011 - 01:39

सोसायटीत ओनर पार्कींग नसल्याने कॉमन पार्कींग मध्ये गाडी पार्क करावी लागते. त्यामुळे गाडीवर नेहमी कोण न कोण बच्चे कंपणी बसलेली असतेच. खुप वेळा समजाउन सांगितले तरी ऐकत नाही. या रविवारीही असंच दोघे मुलं गाडीवर बसलेली, वर कहर म्हणजे आरसे हालव, गियर टाक वगैरे करत होती. तेव्हा मी त्या मुलांना खडसावलेले. वाटले प्रकरण तिथेच संपले असेल. पण काल सकाळी जेव्हा गाडी काढली तेव्हा जाणवले की गाडीच्या इग्निशन मध्ये काड्या खुपसुन ते बंद केलंय, त्यामुळे चावी इग्निशन मध्ये जात नव्हती.

विषय: 

रक्तदानाचे फायदे!

Submitted by हर्ट on 25 January, 2011 - 10:46

मला माझा एक मित्र म्हणाला की ज्या व्यक्तीचा रक्तदाब उच्च असतो त्यानी जर रक्तदान केले तर रक्तदाब कमी होतो. एक मित्र म्हणाला की रक्तात जर कोलेस्टेरॉलची प्रमाणे अधिक असेल तर रक्तदानाचा फायदा होतो. मान्य आहे रक्तदान केल्यानी समाजहिताला आपण हातभार लावतो. पण थोडे स्वार्थी होऊन स्वत:ला रक्तदानामुळे काय फायदे होतात हे इथे विचारावेसे वाटते. जर उच्च रक्तदाब असलेले रक्त एखाद्याने घेतले तर त्याचा रक्तदाब वाढेल का? धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 

भाकरीचे लाडू

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

एक गरीब कुटुंब. जेमतेम हाता-तोंडाची गाठ पडणारं. सणवारास सुद्धा पोटभर जेवायला मिळालं तरी खूप, गोडधोड करणं तर दूरच. नवरा-बायको, दोन-तीन मुलं. सगळ्यात मोठी मुलगी. ह्या कुटुंबात कुठल्या तरी एका सुदिनी सगळ्यांची जेवणं झाल्यावर तीन-चतकोर भाकरी उरते. दुसर्‍या दिवशी मुलांना न्याहरी होणार म्हणून आईला बरे वाटते. पण सकाळी उठून बघते तर काय भांड्यात भाकरी नसतातच. आदल्या रात्री सगळे झोपल्यावर थोरलीला माजघरात जाताना तिने बघितलेले असते. रात्री तिनेच भाकरी खाल्ल्या असाव्यात अशा समजातून आई रागे-रागे मुलीला काही बाही बोलते. दुपारच्या जेवणात थोरली आईच्या पानात लाडू वाढते.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

Koi फिश

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

दक्षिण पुर्व आशिया आणि चिन मधे हे मासे बर्‍याच ठिकाणी पहायला मिळतात , या माशान तिकडे शुभ मानतात असे कुणि तरी सांगीतले नक्की माहित नाही मात्र हे मासे दिसतात सुंदर हे नक्की
koi.jpg

विषय: 
प्रकार: 

पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण

Submitted by नरेंद्र गोळे on 8 January, 2011 - 11:07

पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण
(अमेरिकन प्रवासानुभवाच्या व्यक्तिचित्रणात्मक कथा)
लेखकः डॉ.अशोक ज. ताम्हनकर, प्रकाशकः राजे पब्लिकेशन्स, ठाणे
प्रथमावृत्तीः दत्तजयंती, २० डिसेंबर २०१०, मूल्यः रू.१६०/- फक्त, पृष्ठे १६८

ठाण्यात नुकत्याच संपन्न झालेल्या साहित्य-संमेलनाचे निमित्ताने, अनेक पुस्तके त्यादरम्यानच प्रसिद्ध झाली. हे पुस्तकही त्यातीलच एक होय.

मुख्यत्वे वेंडेल आणि ब्युला यांच्या आठवणी जपण्यासाठी हे पुस्तक लिहील्याचे लेखकानेच अर्पण-पत्रिकेत लिहून ठेवलेले असले तरीही ब्युला, वेंडेल, रिकी, एजाज, रीफ आणि जेस्सी या सहा व्यक्तींची व्यक्तीचित्रे असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.

केरळ डायरी - भाग १

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

कोचीनला विमान केवळ २० मिनीटे उशीरा उतरले तेंव्हा कोट्टायमला नेणारी टॅक्सी तयारच होती. वाटाड्या स्टुडंट जेंव्हा दरवाजा उघडणे, बॅग पकडणे असे करु पाहु लागला तेंव्हा आपले काम आपण (निदान अशी कामे तरी) चा बाणा लगेच सरसावला. जुजबी आणि बोलण्यासारखे बोलुन झाल्यावर पुढचे दोन तास अर्धवट झोपेत, आपण चुकुन घोरत तर नाहीना या विवंचनेत गेले. साधारण ९ वाजता गाडी एका पॉश रेस्टॉरंटसमोर उभी ठाकली. तसा मी खूप खात नाही, पण माझे तलम अॉर्डर करुन झाल्यावर त्याने फक्त फ्रुटसॅलड मागवले.

प्रकार: 

नववर्ष २०११

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

सर्व मायबोलीकरांना नवीन वर्षाच्या भयंकर शुभेच्छा....
जख्खी साहेबांनाही Proud
... .. .. .. .. ... .. ..

विषय: 
प्रकार: 

नववर्षाच्या शुभेच्छा !

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ह्या वर्षी भारतात घेऊन जाण्यासाठी तसेच इथल्या काही मित्र-मैत्रिणींना भेट देण्यासाठी काहितरी वेगळी गोष्ट शोधत होतो. कॉस्कोत फिरताना कळलं की आपण फोटो दिले तर ते त्यांची कॅलेंडर्स, कप्स, ग्रिटींग कार्ड्स इ बनवून देतात. त्यावरून आम्ही स्वतः काढलेल्या फोटोंची कॅलेंडर्स बनवून ज्यांना द्यायची त्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, इथले तसेच भारतातले सणवार त्यावर मार्क करून ती द्यायची अशी कल्पना सुचली. नंतर फोटो निवडताना एकच थीम निवडायच्या ऐवजी त्या त्या महिन्याचे वैशिष्ट्य दाखवणारे फोटो निवडले तर ते जास्त चांगलं वाटेल असं जाणवलं.

विषय: 

होम इंटिरिअर डेकोरेशन अर्थात घराची अंतर्गत सजावट

Submitted by निंबुडा on 26 December, 2010 - 08:52

राहत्या किंवा नवीन घरात अंतर्गत सजावटीच्या दृष्टीने काही बदल करायचे झाल्यास पडणार्‍या प्रश्नांवर चर्चा आणि विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बाफ.

घराचे रंगकाम, फर्निचर, टाईल्स लावून घेणे, प्रकाशयोजना, किचन ट्रॉलीज्, फ्लोरिंग, गृहोपयोगी वस्तू, उपकरणे, घरात नवीन फर्निचर किंवा उपकरणाच्या दृष्टीने करावे लागणारे सिव्हील बदल, खरेदीच्या उत्तम जागा इ.इ. जे काही घराच्या सजावटीत अंतर्भूत असेल त्यावरील प्रश्नोत्तरे इथे अपेक्षित आहेत.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर