अवांतर

सच्चु 100डुलकर :)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

वल्डकप फिव्हर !!!

म्हणे ह्याचं नाव आहे सचिन 100डुलकर Happy

सुंदर माझं घर : कल्पना आणि सूचना

Submitted by मितान on 24 February, 2011 - 08:20

आमच्या शेतावर काम करणार्‍या पार्वतीमावशींच्या घरी गेले होते. पार्वतीमावशी तशी काळी, बुटकी, सुमार अंगकाठी त्यात काळ्या कुळकुळीत केसांना चोपडलेल्या तेलाला उन्हात काम करताना चेहर्‍यावर ओघळावे वाटायचे त्यामुळे एकदम तेलाची देवी दिसायची. हातात चमचम करणार्‍या बांगड्या, नाकात चमकी, कपाळावर दारू पिणार्‍या, दुसर्‍या बाईशी राजरोस संबंध ठेवणार्‍या नवर्‍याच्या नावाचे कपाळभर कुंकू, अंगावर बहुतेक हिरवी किंवा जांभळी किंवा गडद लाल अशा मळखाऊ रंगाची साडी. गळ्यात काळी पोत नि चार सोन्याचे मणी. अशा अवतारात कायम वावरणार्‍या पारवतीचं घर कसं असेल याची कल्पना करता येत नव्हती.

विषय: 

शोलेच्या ठाकूरच्या हातांचा शोध

Submitted by नितीन बोरगे on 23 February, 2011 - 02:06

मित्रानो शोले हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास ३५ वर्ष लोटली आहेत. हा चित्रपट न पाहिलेली व्यक्ती शोधून सापडायची नाही. ह्या चित्रपटातील सर्व पात्रे लक्षात राहिली, पण सर्वात जास्त लक्षात राहतो तो हात नसलेला ठाकूर. "तेरे लिये मेरे पैर हि काफी है", अस म्हणत गब्बर वर तुटून पडणारा ठाकूर पहिला कि नुसता चेव चढायचा अंगात. हात कापलेल्या ठाकूरला लढताना बघताना मला लहानपणी जाम कौतुक वाटायचे. मग शाळेत खेळताना हात मागे बांधून मित्रांशी मारामाऱ्या देखील केल्या आहेत (आणि तोंडावर पडून नाक फोडून घेतली ते सांगायला नकोच,,).

विषय: 
शब्दखुणा: 

मदत हवी आहे charlotte, north carolina

Submitted by सानिका on 20 February, 2011 - 23:35

Charlotte, North Carolina मध्ये Tyvola centre अथवा Ansley falls येथे अपार्टमेंट घ्यायचा विचार करतोय. ह्या communities बद्दल स्थानिक मायबोलीकरान्चा सल्ला हवा आहे.येथील सोयी-सुविधा, office ते घर हे अन्तर हया बाबी जमेच्या आहेत. परन्तु सुरक्षिततेच्या दृष्टीने हा भाग कसा आहे?
तसेच tyvola road हया भागाच्या आसपास १५-२० मिनीटे drive च्या अन्तरावर अजुन कोणत्या चान्गल्या communities आहेत?

विषय: 
शब्दखुणा: 

भावनिक बुध्दयांक

Submitted by बाटेल बामन on 10 February, 2011 - 13:06

भावनिक बुध्दयांक......
कुठे लिहावे ते समजेना म्हणुन या पानावर देत आहे. अयोग्य असेल तर सांगावे.
.
.
माबोकरांनो मला भावनिक बुध्दयांका(EQ) बद्दल जाणुन घ्यायचे आहे. पेपरमधे व इतर चर्चेत अ‍ॅकेड्मीक हुशारीपेक्षाही EQ ला जास्त महत्व आहे असे वाचण्यात ऐकण्यात आले होते. त्यासाठी मी एक इंग्रजीमधे पुस्तक आणले वाचले पण ते जास्तकाही कळले नाही.

अ‍ॅकेडमिक रेकॉर्ड एकदम एक्सलंट असतानाही मला करिअर मधे पाहीजे तसे यश मिळाले नाही असे मला दिड तपानंतरही वाटते. कुठे मुलाखतीला गेल्यावर मला खुप टेंशन येते.भीती वाटते.
आणि मग रिजेक्शन.....

मदिरा प्राशन - पार्श्वभूमी, परिचय, व्यसनमुक्ती , अनुभव व मनःशांती

Submitted by भूत on 8 February, 2011 - 06:42

इतरत्र वाचलेल्या एका धाग्याच्या धर्तीवर हा धागा सुरु करण्यात येत आहे .
येथे सदस्यांनी आपले मदिरानुभव लिहावेत.
दारु कोणती प्यावी ?
किती प्यावी ?
कशी प्यावी ?
कोठे प्यावी ?
कॉकटेलची पाककृती .....ह्याला आपण कॉककृती म्हणुयात ...
सोबतीला काय घ्यावे ? ( चकना ह्या अर्थाने विचारत आहे )
मुजिक कोणते आवडेल ?
मैफील जमणार असेल तर शेरोशायरी वगैरे काही की अजुन ..?
त्या नंतर जेवणाचे काय ? .
उतारा घ्यावा का ? किती आणि कधी घ्यावा ?
दारूमुक्ती
दारूचे परिणाम टाळण्यासाठीचे उपाय
दारू प्यायल्यानंतर घडलेले विनोदी प्रसंग

दारु कशी सोडावी ?
.
.
.
चीअर्स!!

विषय: 

पाकिस्तानातून येणारे फोनकॉल्स.

Submitted by मनिषा लिमये on 8 February, 2011 - 01:26

काल माझ्या फोनवर एका वेगळ्याच नंबरवरुन कॉल आला. ९२ पासुन सुरु होणारा नंबर होता तो. मला मिसकॉल दिसल्यावर मी त्यावर फोन केला . तर पलिकडचा माणुस तुम्हाला लॉटरी लागली आहे आणि बरच काही बोलायला लागला. मी फोन ठेऊन दिला. नंतर नवर्‍याशी बोलताना तो ९२ म्हणजे पाकिस्तानी नंबर असावा अशी चर्चा झाली आणि आज नवर्‍याच्या फोनवरही अशाच ९२ ने सुरु होणार्‍या नम्बरवरुन कॉल आला. मग नेटवर शोधाशोध केली असता हे सापडले

http://cribb.in/airtel-customers-getting-fraud-calls-from-pakistan.htm

http://www.consumercomplaints.in/complaints/355670/page/4

विषय: 

लेखनचोरांची ऐशीतैशी........

Submitted by भुंगा on 4 February, 2011 - 02:59

मितानचा "माझे लेख चोरले गेलेत" हे वाचून असा धागा काढायची इच्छा झाली. यापूर्वीही अश्याप्रकारच्या लेखनचोर्‍या इथे उघड झालेल्या आहेत. मायबोलीकरांपुरते हे थांबवायचे असेल तर असा काही तरी उपक्रम राबवायलाच हवाय. कारण बर्‍याचदा आपल्या विरोधात आरडाओरड झाल्यावर सरसकट दुसर्‍याचा लेख चोरणारा तो लेख डिलिट करून नामानिराळा रहायचा प्रयत्न करतो. पुढे मूळ लेखकाला मनस्ताप झाला तरी काहीच करता येत नाही.

विषय: 

कोकण

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मागच्या आठवड्यात हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगार, गुहागर, असगोली हेदवी, वेळणेश्वर आणि महाबळेश्वर अशी मस्त भटकंति झाली. थोडी पेंटीग्ज आणि भरपुर आराम केला. हे नंतर घरी कॅन्व्हास वर केलेले अ‍ॅक्रेलीक . अ‍ॅक्रेलिक वॉटरकलर सारखे ट्रान्स्परन्ट किंवा ऑईल सार्खे ओपेक वापरता येत मात्र ते रंग येव्हढे पटकन सुकतात त्यामुळे पेंटींग करणे मला बरेचसे कंटाळवाणे वाटते त्यामुळे शक्य्तो मी हे माध्यम टाळत आलोय.
guhagar.jpg

विषय: 
प्रकार: 

मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग विज्ञान रंजन स्पर्धा २०११

Submitted by anudon on 2 February, 2011 - 23:43

Hello all,
We are forwarding a circular in marathi received from Maharashtra Vidnyan Parishad about an interesting Quiz in view of the International Year of Chemistry-2011. Solve it and forward it to many more people like you.
Thanks,
Col. Anand & Dr. Swatee Bapat.

सप्रेम नमस्कार
२०११ हे आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष आहे. मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विज्ञान रंजन स्पर्धा होत आहे. या स्पर्धेची प्रश्नावली सोबत पाठवत आहे. आपल्याला आवडेल, मजा येईल.त्यासाठी आपणाकडून पुढील पैकी एक वा अनेक प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

    विषय: 

    Pages

    Subscribe to RSS - अवांतर