अवांतर

मायबोली डिस्क स्पेसवरचा ताण कमी करण्यासाठी आपला खारीचा वाटा

Submitted by जिप्सी on 12 April, 2011 - 06:32

आपल्यापैकी बरेचसे लोक असे असतील कि ज्यांचा एकही दिवस मायबोलीला भेट दिल्याशिवाय जात नसेल. व्यस्त कामातुन थोडावेळ का होईना मायबोलीवर येऊन, येथील विविध विभागांना भेट देऊन, प्रतिसाद देऊन जाणारेहि बरेच आहेत. खरोखर मायबोली म्हणजे एक न सुटणारे व्यसनच. Happy
आपणही बर्‍याचवेळा मायबोलीवर येऊन लेख, प्रचि, कविता, ललित इ. इ. काहि ना काहि लिहत असतोच. किंवा एखाद्या आवडलेल्या लिखाणावर/प्रचिवर आपले प्रतिसाद देत असतो.
अशा विविधप्रकारे मायबोली सर्व्हर वर थोडा ताण वाढण्यास आपण कारणीभूत असतो. मध्येच कधीतरी मायबोली द्रुपालच्या स्वरूपात आपला राग प्रकट करते. Happy

विषय: 

मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई २०११ नावनोंदणी

Submitted by kanchankarai on 12 April, 2011 - 01:51

नमस्कार,

२०११ सालातील एक ब्लॉगर्स मेळावा दादर, मुंबई येथे ५ जून २०११ रोजी सायंकाळी ५:३० ते रात्रौ ८:३० या वेळात आयोजित करण्याचे ठरवले आहे. मेळाव्याच्या संयोजक आहेत ब्लॉगर सौ. कांचन कराई व आयोजक असतील ब्लॉगर श्री. महेंद्र कुलकर्णी, श्री. सुहास झेले व श्री. विशाल रणदिवे.

विषय: 

जरा हटके.....!!

Submitted by Kiran.. on 8 April, 2011 - 23:59

एकटं कधी राहू नये म्हणतात. आणि राहीलंच तर रिकामं राहू नये.. नाहीतर सैतानाचं थैमान चालू होतं. पण माझ्यासारखे लोक्स गर्दीतही एकटे असतात. समोर घडणा-या प्रसंगापासून एकदम अलिप्त राहून स्मरणरंजनात किंवा कल्पना विलासात मग्न होतात..

वेगात विचार करणं आणि त्या विचारात दंग राहणं हा वेळ चांगला घालवायचा चांगला मार्ग असला तरी आपल्या आजूबाजुंच्यांना त्याचा चांगलाच त्रास होतो. कित्येकदा काय विचार करत होतास या प्रश्नाला उत्तर देता येत नाही..

चित्रप्रदर्शन -

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

१२ ते १८ एप्रिल २०११ या कालावधित आमचे चित्रप्रदर्शन नेहरु सेंटर वरळी मुंबई येथे आयोजित केले आहे. वेळ ११ ते ७
या प्रदर्शनात इतर सहभागी चित्रकारांविषयी थोडी माहीती.
संतोष पेडणेकर- अनेक पुरस्कार प्राप्त चित्रकार, स्व. K B कुलकर्णी आणि जॉन फर्नांडिस यांचे मार्गदर्शन . त्यांच्या फिगरेटिव्ह कामावर जॉन फर्नांडिसांचा प्रभाव जाणवेल.
रमेश नाईक - K B कुलकर्णी यांच्या बेळगाव येथिल आर्ट स्कुल मधे पाच वर्ष कला शिक्षण, जॉन फर्नांडीस यांचे सहाध्यायी. ऑईल आणि अ‍ॅक्रेलिक या माध्यमांवर प्रभुत्व.
पंकज चापेले- रहेजा आर्ट स्कुल चे स्नातक आणि प्रसिद्ध इल्स्ट्रेटर. जलरंगावर खास प्रभुत्व.

विषय: 
प्रकार: 

गाज (१)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

लांबच लांब पसरलेली पोपडे धरलेली जमीन आणि भक्क ऊन. अंगाची लाही लाही करणारं. पिवळ्यापासून नारंगी-तांबड्या-लालभडक रंगांच्या असतील नसतील तेवढ्या छटा प्रदर्शन मांडून बसल्यागतच. एखादं माणूस, झाड किंवा सावलीचा तर प्रश्नच नाही. जिवंतपणाचे कुठचेही चिन्ह नाही. ते ओसाड माळरान होतं, की वाळवंट, की एखादं बेट की काहीतरी तसंच. पण या अशा वैराण जागेत त्याला स्वतःचं अस्तित्व एकदम भगभगीत आणि एखाद्या दुखर्‍या जागेसारखं किंवा जखमेसारखं सटसट करत कळवळायला लावणारं आणि एकदम क्षुद्र-क्षुल्लक वाटल्यागत. या सार्‍यात आपण का आहोत- असा विचार करत असतानाच जवळच ती पडकी खोली अचानक उगवल्यागत दिसल्यासारखी.

विषय: 
प्रकार: 

रेकी क्लासेस

Submitted by नीलू on 25 March, 2011 - 08:36

मुंबईत रेकी क्लासेस कुठे आणि कोण घेतात याची माहिती हवी आहे? विशेषतः मुलुंड ठाणे परिसर.
या क्लासेसचा कुणाला वैयक्तिक अनुभव आहेत का? एका रेकी पुस्तकात वाचले होते की पुस्तक वाचून रेकी शिकता येत नाही त्याला रेकीमास्टरकडेच जावे लागते.. शिवाय बर्याच जणांकडून ऐकलेही आहे. हे खरं आहे का? खरतर बाजारात रेकी वर असंख्य पुस्तके आहेत. तसे नेटावर शोधाशोध केल्यावर बर्याच क्लासेसची माहिती मिळते पण ते कितपत व्यवस्थित शिकवतात, योग्य आहेत का याची खात्री नाही.

रेकी विषयी अजून ही काही माहिती असल्यास तीही कृपया ईथे सांगावी.

मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 

पूर्व भारतात राहणारे मायबोलीकर

Submitted by ganeshbehere on 22 March, 2011 - 02:57

नमस्कार,
उत्तर पुर्व (नॉर्थ इस्ट) भारतात कोणी मायबोलीकर आहात का?

नोकरी निमित्त आम्ही फेब्रुवारी २०११ पासुन बारापाणी (मेघालय) येथे राहायला आलो आहोत.

विषय: 
प्रांत/गाव: 

राँग नंबरच्या गमतीजमती

Submitted by साधना on 20 March, 2011 - 07:15

हल्ली मोबाईलवरही राँगनंबर भरपुर येतात. कधी आपण मोबाईलमधला साठवुन ठेवलेला नंबर लावला तरी तो चुकून भलतीकडेच जातो, तर कोणी आपल्याला फोन करतो आणि आपण हॅलो म्हटले की, 'अमित को फोन दिजीये' अशी ऑर्डर सोडतो Happy

हा धागा तुम्ही अनुभवलेल्या राँग नंबरच्या गंमतीजंमती मायबोलीकरांना सांगुन पुन:प्रत्ययाचा आनंद घ्यावा यासाठी खास.... Happy

सुरवात माझ्यापासुन...

विषय: 

'नातिसरामि' - स्वेतलाना आर. भाट

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

जी वाचायला मिळावी म्हणून १८ वर्षांखाली वय असलेल्यांनादेखील आपण सज्ञान असल्याचे अ‍ॅफिडेविट करायची इच्छा प्रबळ व्हावी, अशी एखादीच कादंबरी अचानक आढळते. तीही अनेक दशकांतून एखाददाच! प्रसिद्ध होण्याआधीच लाखभर प्रतींची आगाऊ नोंदणी झालेली 'नातिसरामि' ही अशीच कादंबरी आहे. ती अफाट आहे. 'सर' आणि त्यांच्या सात वादळी प्रकरणांची ही कथा. या सातही प्रकरणांत सर स्वतःला पूर्णपणे झोकून देतात, पण काही काळानंतर तितक्याच अलिप्तपणे ते त्यातून बाहेरही पडतात. हे प्रकरणातून बाहेर पडणं शेवटच्या प्रकरणाच्या बाबतीत अतिशय अफलातून पद्धतीने मांडलं आहे. सातवं प्रकरण आणि त्या प्रकरणाचा शेवट, ही कल्पनाच केवळ लाजवाब आहे.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर