अवांतर

ग्रनियन रन, एक अनोखा अनुभव

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

गेल्या महिन्यात ग्रनियन (Grunion) रन अनुभवायला मिळाला. मॅरॅथॉन्सचे इतके पेव फुटले आहे की आधी तसाच हा ही एखादा रन असावा असे वाटले. पण हे सामन (Salmon) रन्सच्या जास्त जवळ आहे हे थोडी माहिती मिळवताच लक्षात आले व तिथे जायचे हे लगेच ठरविले. ग्रनियन्स हे चार-सहा इंच लांबीचे मासे दक्षिण कॅलिफोर्नीयाच्या समुद्रतटाजवळ आढळतात. तीन-चार वर्षे जगु शकणाऱ्या या माश्यांनी पुढच्या पिढीला जन्म देण्याचा एक अनोखा प्रकार उत्क्रांतीच्या वैविध्यपूर्ण विश्वाला बहाल केला आहे.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

रा रा उन्हाळी गटग - मे महिना २०१२

Submitted by माधुरी१०१ on 30 March, 2012 - 15:05
तारीख/वेळ: 
19 May, 2012 - 14:49
ठिकाण/पत्ता: 
कधी? :- १२ मे / १९ मे (ज्या तारखेला जास्त उपस्थिती असेल ती)

कुठे? :- आत्ताच हाती आलेल्या बातमी नुसार ठिकाण नक्की झालेलं आहे-- अर्पणाचं घर-- बेसिंगस्टोक (Basingstoke)
डिटेल पत्ता येणार्‍यांना मेल करून कळवण्यात येईलच.

वातावरण छान होत आहे. मे मध्ये तर अजुन मस्त असेल. तर मग असाच एक उनाड दिवस आपल्या
रा.रा. मायबोलीकरां सोबत घालवुयात अस रा.रा मायबोलीकरांकडुनच ऐकायला येत आहे सध्या.
तर मग ठरवुयात पटापट आणि भेटुयात मे मध्ये Happy

विषय: 
प्रांत/गाव: 

फर्निचर ट्रान्स्पोर्ट करण्याबद्दल माहिती

Submitted by सावली on 29 March, 2012 - 10:01

मला एक सोफा सेट मुंबईहुन दुसर्‍या ठिकाणी पण महाराष्ट्रातच पाठवायचा आहे.
साधारण किती खर्च येईल आणि कोणामार्फत पाठवता येईल?
कुणाचे अनुभव असतील तर तेही लिहा प्लिज.

विषय: 

सचिनने रचला इतिहास !!

Submitted by RISHIKESH BARVE on 28 March, 2012 - 13:38

नवज्योत सिंग सिद्धू यानी सांगितलेली १९९८९-९० च्या पाकिस्तान दौर्याची गोष्ट.
(या दौर्यातच सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकलां)
१९८९ चा पाकिस्तान दौरा.
पहिल्या तीन मॅचेस ड्रॉ झालेल्या.
चौथी मॅच सयालकोट. महांमद अली जीना स्टेजडयम. ग्राऊडवर गवताच साम्राज्य.
इम्रानखानने धमकीच दिली होती. जो गवत कापील त्याचा गळा कापीन. हेच शब्द . गळा कापीन! फ़ास्ट बॉल साठी पूर्णपणे इंतजाम करून ठेवलेला.

प्रांत/गाव: 

इतिहासाचे विकृतीकरण

Submitted by RISHIKESH BARVE on 28 March, 2012 - 13:30

संभाजी ब्रिगेडचे माहिती तंत्रज्ञान प्रमुख श्री भैय्या पाटील यांच्या प्रश्नाची उत्तरे

१) ब्राह्मण : हिंदू विरुद्ध मुसलमान वा हिंदू विरुद्ध ख्रिश्चन वा अशाच धार्मिक दंगली मध्ये ब्राह्मण का मारत नाही?

उत्तर:- ब्राह्मणांना माहिती आहे कि सध्या जे हिंदू-मुस्लीम राजकारण सुरु आहे त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. तसेच हि धार्मिक तेढ राजकीय पुढार्यांनी (मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत) लाविली आहे. ब्राह्मण हा पूर्णपणे मुसलमानी आतंक वादाच्या विरोधात आहे. पण त्याला जातीय दंगली किंवा धार्मिक तेढ हा उपाय मान्य नाही.

कोबी -गाजर पराठे

Submitted by प्रितीभुषण on 27 March, 2012 - 05:59

लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१)खिसलेला कोबी पाव किलो [किंवा १ वाटी
२)खिसलेले गाजर १ वाटी
३) मिर्ची +लसुन+ आले +कोथिंबिर =पेस्ट
४) तेल, हिंग, हळद, जिरं +धने पावडर
५) चवीसाठी मीठ
६) गव्हाचे पिठ
७) दही किवा आवडी प्रमाणे एखादी चटणी

क्रमवार पाककृती:
१) १ ते ६ सगळे एकत्र मळुन घ्यावे ५ १० मिनिटे झाकुन ठेउन द्यावे
२)चपाती /पराठे लाटतो त्या प्रमाणे लाटुन तव्या वर दोन्ही बाजुने छान भजुन घ्यावे
३) दही किवा आवडी प्रमाणे एखादी चटणी बरोबर खावे

माहितीचा स्रोत:
आई + सासुबाई

विषय: 
शब्दखुणा: 

जुनी हिरो-होंडा विकायची असल्यास

Submitted by हर्ट on 26 March, 2012 - 04:43

मी ९ वर्षांपुर्वी माझ्या भावाला ६५ हजाराला हिरो होंडा घेऊन दिली होती. ती आता विकायची आहे. गाडी अजून चांगली आहे. एक विचारायचे आहे की विकताना काय काय कागदपत्रे असावी लागतात? म्हणजे ती शोधून तयार ठेवेन. आणि जर ६५ ला घेतली असेल तर ती कितीला विकावी? धन्यवाद.

विषय: 

लाकडी सामान dismantle

Submitted by प्रितीभुषण on 24 March, 2012 - 06:26

लाकडी सामान dismantle ::माझ्या घरात एक बेड आणि एक wardrobe आहे
आता मला शिफ्ट करायचे आहे तर मी ते घरीच डिसमेनटल करायचा विचार करत आहे त्या साठी लागणारी उप्करणे मुंबईत कुठे मिळतिल???
घरीच डिसमेनटल करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लगतिल??

विषय: 

चित्रात संवाद भरा! - चित्र क्र. ४ समाविष्ट

Submitted by निंबुडा on 23 March, 2012 - 05:17

चित्र क्र. १

या चित्रातील या दोन लहानग्यांमध्ये काय काय संवाद घडू शकतील? जरा कल्पनाशक्तीला ताण द्या आणि त्यांच्या तोंडी संवाद भरा.
थोडी हसवणुक Happy

38.jpg

चित्र क्र. २

शोले! हिंदी सिनेमा जगतातील एक अजरामर नाव. हा सिनेमा न पाहिलेली व्यक्ती दुर्मिळच! या सिनेमातल्या "अंग्रेजके जमानेके जेलर" असलेल्या असरानीचा हा सिनेमातला एक शॉट. चला आता या चित्रात संवाद भरु! Happy

sholay23.jpg

चित्र क्र. ३

पुन्हा एकदा शोलेच!

विषय: 

थंड डोके, दूरदृष्टी, सखोल विचार/ सज्ज जाहलो करण्या विश्वसंचार

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

KISS (केक इन्स्टिट्यूट अॉफ स्पेस स्टडीज) च्या सौजन्याने एक बस भरून कॅलटेक-जेपीएल चे आम्ही ५९ लोक ८ मार्च २०१२ ला स्पेस-एक्स (SPACEX - http://www.spacex.com) ला गेलो. spacex ला सहजी जाता येत नाही म्हणून लॉटरीत नावे टाकून आमची निवड झाली. डाऊनटाऊनची संध्याकाळची गर्दी टाळण्याकरता एक-दोघे वगळता सगळेच बसने आले.

आम्ही जरा जास्तच वेळेवर पोचल्याने थोडावेळ बाहेर थांबावे लागले - लोकांचे पासपोर्टस, ओळखपत्रे वगैरे पण तपासून होत होते. बाहेर एक लालभडक टेस्ला उभी होती. ५० हजार डॉलर्सच्या या गाड्या पृथ्वीचे आवश्यक भविष्य असु शकतात.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर