अवांतर

सोलर वॉटर हिटर माहिती हवी आहे

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 31 October, 2012 - 01:56

बर्‍याच दिवसाचा विचार होता की घरी सोलर वॉटर सिस्टीम घ्यावी. पण ते बजट मध्ये जमत नव्हते, शिवाय त्यावर खरोखरच चांगले पाणी तापते काय? या बद्दल साशंक होतो. आता घ्यायची ईच्छा आहे. तसेच आता सिलेंडरचेही प्रॉबलेम सुरु झालेच आहे.
घरात अंदाजे वेळोवेळी येणारी पाव्हणे धरुन १० ते १२ व्यक्तीसाठी किती लिटर क्षमतेचे घ्यावे, कुठल्या कंपनीचे घ्यावे, अंदाजे किंमत व सबसीडी किती मिळेल कॄपया माहीतीगारांनी कळवावे हि विनंती.

विषय: 
शब्दखुणा: 

पक्षीनिरीक्षण

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

अनुश्काने लिहिलेला लेख. http://www.kikasbirdclub.org/2012/10/04/heronry/

अनुश्काला, माझ्या लेकीला, पक्षीनिरिक्षणाची आवड आहे. सुरुवातीला ती श्री. किरण पुरंदर्‍यांबरोबर शिकायला जात असे, आता जवळपासच्या पक्षी निरीक्षण सहली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करते. त्यांनीच तिला लिहिण्यासाठी उद्युक्त केले आहे आणि तिचा हा पहिला लेख.

Happy

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

'दरजा'

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

पुर्वप्रसिद्धी- 'माहेर' दिवाळी अंक २०११.
इथे माझ्या ब्लॉगवर (रंगीबेरंगीवर) पुन्हा प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल माहेरच्या कार्यकारी संपादक सुजाता देशमुख यांचे आभार.

***
***

प्रकार: 
शब्दखुणा: 

आमच्या गावातील एक आश्चर्य

Submitted by Mandar Katre on 28 October, 2012 - 08:00

आमच्या गावात एक बाबू देवरुखकर म्हणून व्यक्ती आहे, वय ४५ . तसा मंदबुद्धीच आहे, गावात हमाली ,पेपर टाकणे वगैरे उद्योग तो करतो. पण त्याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे .

लहानपणी शाळेत असताना त्याला मारकुटे मास्तर होते .त्यांच्या माराच्या भीतीने हा बाबू सगळी पुस्तके तोंडपाठ करून टाकी .म्हणजे अमुक धडा वाच,असे सांगितल्यावर पुस्तक नुसते समोर धरून तोंडपाठ धडा घडाघड म्हणून दाखवी.पण धड्यावरील प्रश्न विचारले असता त्यांची उत्तरे त्याला येत नसत ..............साहजिकच सतत नापास होत असल्याने चौथीतून त्याला शाळा सोडावी लागली.

विषय: 

भरतभेट-२०१२

Submitted by मुंगेरीलाल on 26 October, 2012 - 05:49

सकाळची वेळ होती, तरीही हवेत किंचित उकाडा जाणवत होता. रामराव पाटील त्यांच्या 'पर्णकुटी' फार्म हाउस बाहेरच सावली धरून वाऱ्याला बसले होते.

आज उपास असल्यामुळे सकाळी नुसती उकडलेली रताळी खाऊन जरा सुस्ती आली होती. जरा डुलकी आल्यासारखे वाटले तोच एका धुक-धुक-धुक-धुक आवाजाने त्यांची तंद्री भंगली. हा कसला आवाज? रामराव तटकन उठले, मागच्या बाजूला आवाजाच्या रोखाने जात दूरवर नजर टाकली. भरत? होय, हा भरतच. काही क्षणात त्यांची खात्रीच पटली.

धूळ उडवत भरत आला आणि गाडी लावून त्यांच्या जवळ येऊन पाया पडला देखील. आशीर्वाद देता देताच रामरावांनी पृच्छा केली.

विषय: 

"क्वार्टर ऑफ अ‍ॅन इंच" हेअरकट

Submitted by फारएण्ड on 25 October, 2012 - 10:47

सलून मधे खुर्चीवर जाऊन बसलो, "मिडियम", आणि भांग कोठून पाडायचा हे सांगून झाले, सलून मधली ती मुलगी तिच्या कामाला लागली, आणि मी आता वेळ कसा घालवावा विचार करू लागलो. भिंतीवरच्या फ्रेम्समधल्या हेअरस्टाईल्स आधीच बघून झाल्या होत्या. त्यातील एकही गेल्या दहाबारा वर्षातली दिसत नाही याचेही नावीन्य नव्हते. तेथे बसल्यावर तो घोस्ट वर्ल्ड का कशातील संवाद नेहमी आठवतो "The 80s have called and they want their hairstyle back". काही सलून्स मधे आरशात उलटा का होईना पण टीव्हीतरी दिसतो. येथे ते ही नव्हते. इतरही काही टाईमपास नव्हता.

ओरिफ्लेम ब्युटी प्रोडक्ट्स

Submitted by जाह्नवीके on 25 October, 2012 - 09:53

नमस्कार,

माझ्याकडे ओरीफ्लेम चे सर्व प्रोडक्ट्स विक्रीसाठी आहेत. खाली चालू महिन्याच्या केतालोग चा धागा देत आहे.
कुणाला हवे असल्यास माझ्याशी विपु तून संपर्क करावा..

http://in.oriflame.com/products/catalogue-viewer.jhtml?per=201210

जाह्नवी

विषय: 
शब्दखुणा: 

वेंकट

Submitted by Mandar Katre on 24 October, 2012 - 02:54

नमस्कार
मी वेंकटेशन अय्यर .
हस्तांदोलन करीत तो म्हणाला .आज तो नावाने आमच्या टीम मध्ये सामील होत होता . ओमान मधील “पी डी ओ “ या प्रथितयश कंपनीच्या आलिशान कार्यालयात आमच्या ग्रुप मध्ये आजपासून हा नवीन “मल्लू” जॉईन झाला होता. अशा अनेक “मल्लू”सोबत आजतागायत काम केले असल्याने त्यात विशेष काहीच वाटले नाही...आमच्या ग्रुप चा अन्वर नावाचा दुसरा एक मराठी सदस्य मला हळूच मराठीतून म्हणाला...”चला, आणखी एक यंडूगुंडू आले रे” ...मीही हसून अन्वर कडे पहिले आणि कामात गर्क झालो...

विषय: 

अत्यद्भुतम प्रहृतमात्तऋषां तथापि .....भाग ३

Submitted by Mandar Katre on 23 October, 2012 - 13:49

त्यानंतर दिवसभर या विषयाशी संबंधित प्रशिक्षण सुरु होते .संध्याकाळ होईपर्यंत मला प्राथमिक स्वरूपात ती विद्या येवू लागली होती.संध्याकाळी मी घरी गेलो. घरी गेल्यावर काय करावे ते सुचत नव्हते . माझा मुलगा अलेक्स आणि पत्नी अॅना डिनर घेत होते .मीही डिनर केले .पण तो सारा वेळ मला त्यांच्याशी नीट बोलता येत नव्हते .आज काहीतरी निराळे घडले आहे हे अॅनाने ओळखले .

आज रात्री काय होणार ? या विचारांच्या तंद्रीतच माझा डोळा लागला..................

विषय: 

एक मजेशीर निरिक्षण

Submitted by रमेश भिडे on 23 October, 2012 - 12:27

हा विषय माझ्यामते चर्चा करायला फार काही आक्षेपार्ह विषय नाहीये असं माझं मत असुन त्याकरता एका वेगळ्या विनोदी ढंगाने तो मी शेअर करु इच्छितो ( एकता कपुरसारख्या निर्मात्यांनी EXTRA MARITAL AFFAIRS ना जी प्रतिष्ठा व प्रसिध्दी मिळवुन दिली आहे त्यानुसार हा विषय आता एखाद्या CEO पासुन अशिक्षित मजुरापर्यंत सगळ्यांना भली भांती परिचित आहे) विवाहबाह्य संबंध ही माझ्यामते समाजाला लागलेली किड आहे..जी समाज आतुन पोखरत आहे.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर