अवांतर

कृष्णधवल पाने

Submitted by सागर कोकणे on 7 December, 2012 - 10:34

निमित्त झाले ते रणबीर कपूरच्या एका जाहिरातीचे. जुन्या काळातल्या रहदारीविरहित मुंबईतून गाडी चालवत गाणे गुणगुणत जाणारा नायक आणि तोही कृष्णधवल रंगांत. भूतकाळात डोकावणे हा तसाही माझा आणि माझ्यासारख्या इतर अनेक स्वप्नाळू माणसांचा आवडता छंद आणि त्यात आपण न पाहिलेल्या काळात डोकावणे म्हणजे कायमच कुतूहल वाढवणारे...

विषय: 

पोपट झाला रे ...

Submitted by मामी on 5 December, 2012 - 11:37

दोनेक महिन्यांपूर्वीची गोष्ट. रविवारच्या निवांत दुपारी शाकाहारी जेवण जितपत अंगावर येईल तितपत आलेलं. मला होत असलेली झोपेची तीव्र इच्छा निग्रहाने नाकारून लेकीच्या अभ्यासाला बसण्याकरता मिनतवार्‍या करत होते. अर्थात 'असल्या प्रयत्नांना कसे टाळावे?' या विषयात पीएचडी केली असल्यामुळे ती नुसतीच इथे तिथे वेळकाढूपणा करत होती.

अचानक माझ्या बाल्कनीला आवाज फुटला. टीटीव्....टीटीव... (याचं मराठी भाषांतर विठू विठू असं करतात.)

माझ्या बाल्कनीला वेगवेगळे आवाज फुटतात. त्यातला घुट्टरघूं आवाज अतिशय वैतागवाणा असतो. आणि तो सदोदित येत असतो. कावळेदादा कधीमधीच येतात.

विषय: 

पश्चातापाची वेळ चुक झाल्यानंतर

Submitted by हर्ट on 5 December, 2012 - 02:04

जेंव्हा आपण एखादी चुक करतो आणि त्या चुकीनंतर आपल्यावर जर पश्चातापाची वेळ येत असेल. त्या पश्चातापाच्या आगीत जर आपण पोळत असलो तर त्यातून आपण बाहेर कसे पडावे? ह्यावर कुणी काही सांगू शकेल का? धन्यवाद.

विषय: 

हल्लो, मैक टेस्टिन्ग..

Submitted by मुंगेरीलाल on 3 December, 2012 - 12:54

‘तर यायचं बरं का सगळ्यांनी, सुरवातीला सांस्कृतिक कार्यक्रमही ठेवला आहे आपल्याच लोकांचा, तो मात्र मुळीच चुकवू नका’, असं पुन्हा बजावत परिचित निरोप घेतात आणि मी हो-हो करत त्यांना दारापर्यंत पोहोचवतो.

आजकाल कुठलाही छोटेखानी समारंभ असला की मला तिथले प्रेक्षक, माईक-सिस्टीम आणि त्यावरून बोलणाऱ्या मंडळींचं जे एक खास समीकरण असतं ते सहन करत बऱ्याचदा कार्यक्रमभर बसून राहावं लागतं कारण मी कुणाला तरी सोबत म्हणून आलेलो असतो आणि तो मला घरी परत सोडणार असतो.

विषय: 

२ आठवडे प्रशिक्षण

Submitted by जाईजुई on 30 November, 2012 - 04:30

माझ्या डच व्यवसायबंधूची १५ वर्षे वयाची मुलगी द्विभाषिक शिक्षण घेत आहे (डच आणि इंग्रजी). त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून त्यांना २ आठवडे एकाद्या इंग्रजी भाषिक देशात काम करणे आवश्यक आहे.

११ फेब्रुवारी ते १ मार्च २०१३ ह्या काळात ती माझ्याकडे (ठाणे) रहाणार आहे.

तिच्यासाठी मी योग्य प्रशिक्षण संधीच्या शोधात आहे.

गरजा -
१. ठाणे/मुलुंड परिसरातील व्यवस्थापन
२. सुरक्षित व्यवस्थापन
३. इंग्रजी भाषेचा दैनंदिन वापर
४. प्रशिक्षण संपल्यावर तिच्या अहवालावर स्वाक्षरी

कामाचे स्वरुप -
१. शाळेत/ बालवाडीत मुलांबरोबर शिकवणे, गोष्टी सांगणे

विषय: 
शब्दखुणा: 

कथा अमक्या-तमक्याची.

Submitted by मुग्धमानसी on 28 November, 2012 - 03:06

कथा अमक्या-तमक्याची....

आटपाट नगर होतं... एकविसाव्या शतकातलं. तिथं एक मध्यमवर्गीय ब्राम्हण रहात होता... कुठल्या शतकातला ते तुम्ही ठरवा. त्याचं नाव होतं अमुक-तमुक. त्याची बायको अमकी-तमकी. आणि त्याची मुले... वगैरे वगैरे.

अमुक-तमुक रोज सकाळी निवांत उठायचा. अमकी-तमकीने दिलेला चहा चवी-चवीने प्यायचा. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचताना नियमितपणे न विसरता चुकचुकायचा आणि चेहरा विषण्ण करायचा. मग तो ’शुचिर्भूत’ व्हायचा. म्हणजे स्नान करायचा... वगैरे वगैरे.

आणि मग सुरू व्हायची त्याची देवपूजा!!

शब्दखुणा: 

ज्येष्ठ नागरीक संघाविषयी माहिती

Submitted by मी अमि on 23 November, 2012 - 12:07

माझ्या एका परिचयातील ज्येष्ठ नागरीक पतीपत्नींना मुलाने वाईट वागवल्याने ते अगदी एकाकी झाले आहेत. त्यांनी ज्येष्ठ नागरीक संघ जॉइन केल्यास त्यांना दु:खातून बाहेत पडायला मदत मिळेल आणि त्यांचा काही वेळ आनंदात जाईल, असे वाटल्याने मी माहिम, माटुंगा, दादर या भागातील ज्येष्ठ नागरीक संघ शोधत आहे. कॄपया कुणी माहिती देऊ शकेल का?

विषय: 

फाटती विरल्या विजारी फार हल्ली..

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

सांडती नोटा नि नाणी याच गल्ली
फाटती विरल्या विजारी फार हल्ली

पुसल्या न शंका मम मनाला डंखणार्‍या,
मंडळी देतात सल्ले फार हल्ली

गावता ब्लिंपास उंची विरहण्याची,
खेचती खाली दिवाणे फार हल्ली

लेखिता कवतीक आपुले चिमुटभरिचे
सांगती, 'माझेही अस्से' फार हल्ली

जमताच माझा कंपू मजला चेव येतो
कोपचे उजळून येती फार हल्ली

का कुणी ओळींस वाची या फुकाच्या
गावतो का वेळ हापिसी फार हल्ली?

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

श्रद्धांजली

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

येका युगाचा अंत. त्यांच्या विचारसरणीशी अनेकांचे मतभेत असतील मात्र एक व्यंगचित्रकार ते जनाधार असलेला महत्वाचा राजकिय नेता हा प्रवास नक्किच खुप मोठा . श्रद्धांजली
IMG-20121117-00335.jpg

विषय: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर