अवांतर

दे लिव्ह्ड हैपिली एवर आफ्टर….

Submitted by विद्या भुतकर on 6 September, 2013 - 00:38

एकंब्याच्या स्टोपवर उत्तम उतरला. पांढऱ्या धुळीच्या लोटाकडे वैतागून पहात त्याने आपला पांढराच शर्ट झटकला. मागून प्यांटही झटकली आणि कुणी ओळखीचं दिसतंय का म्हणून इकडे तिकडे पहिले. आता कुणी न्यायला आलं असलं पाहिजे असं तर नव्हतच. तो कुणालाही न कळवता आला होता. जावई म्हणून एरवी असणारा माज त्याला आज करता येत नव्हता. नाहीतर रहिमतपूरातून निघालं की फक्त कोरेगाव गाठायचं काम होतं त्याचं. बाकी मग पाटील कुणाला तरी पाठवायचेच त्याला आणायला. त्यामुळे बसने असं एकंब गाठायला त्याला जर चिडचिड झाली होतीच. पण पर्याय नव्हता.

विषय: 

लुंगी डान्सवर थिरकणार पावले

Submitted by मुग्धटली on 5 September, 2013 - 02:38

आजच्या सकाळ वर्तमानपत्रात मुख्य पानावर ही बातमी पाहिली. घरी वेळ न मिळाल्याने ऑफिसला येउन वाचली. "जिंदगी जिंदगी, लल्लाटी भंडार, चिंताता चिता चिता, लुंगी डान्स... लुंगी डान्स, वन टु थ्री फोर, गो गो गोविंदा, डॉन भाई का मैं तो डंका बजाऊ, देवा श्री गणेशा, बलम पिचकारी, ढिंक चिका, हूड दबंग दबंग, ड्रीमम वेकपम, यांसारखी एकाहून एक दणकेबाज गाणी यंदा गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीमध्ये तरुणाईला थिरकायला लावणार आहेत." हे आहे पुणे सकाळमधे आलेल्या बातमीचे पहिले वाक्य.

विषय: 

उपास...अर्धापावशतशब्दकथा

Submitted by आशुचँप on 2 September, 2013 - 09:23

त्याने तीला जवळ ओढले...
नको ना रे...
का?
आज उपास आहे माझा...
Uhoh

काहीच्या काही लेखन असा विभाग अस्तित्वात नसल्याने हे इथे टाकत आहे...
इतर शतशब्दकथा लेखकांनी दिवे घ्यावेत

विषय: 

आठवण - अर्धशतशब्दकथा

Submitted by बेफ़िकीर on 31 August, 2013 - 02:18

"ये ना"

"नको"

"का?"

"बघतात"

"बघूदेत"

"हसतात"

"हसूदेत"

"लवकर ये"

"कशाला?"

"कससंच होतंय"

"पण एकदाच हं?"

"हो"

"घे, आले"

"गर्र्घर्र्र्र्र्र्र्स्स्स्स्स्स्स"

"झालं?

"हो, आता बरं वाटतंय"

"आता एकदम रात्रीच्या जेवणानंतर"

"चालतंय"

"तोवर आठवण नाही येणार माझी?"

"तोवर कशी आठवण येईल?"

"का?"

"तुझी आठवण जेवणानंतरच येणार... तू तर एक ढेकर आहेस ना?"

दही हंडी

Submitted by व्यत्यय on 30 August, 2013 - 02:47

अंकुश सावंत कालपासूनच उदास होतो. सालाबाद प्रमाणे याही वर्षी दहीहंडी उत्सव आलेलो. तेच्या आवशीन अंकुशाक कधी दहीहंड्येक जावूक दिल्यान नाय. “बाकीच्यान्का चार चार प्वारा आसत, माजो एकलोच आसा” ह्या तिचा म्हणणा. अंकुश शिकलो, मोठ्या कंपनीत सायेब झालो तरी तेच्या मनातलो सल काय जावूक नाय. भायेर लाऊडस्पीकरवरून “मच गया शोर” गाणा लागला की भूतूर अंकुश पाण्याभायेरल्या मासोळीसारखो फडफडायचो. अंकुश ल्हान असताना सावतीन तेका तेच्या मामाकडे धाडून देयची. अंकुशचो मामा चाळ्येत नाय तर येका कोलनेत रवायचो. थयसर ह्या दहीहांडेचा धुमशान नवता. आतापन चेहरो पाडून बसलेल्या तेका बघान सावतीनीने त्वांड सोडल्यान.

विषय: 

शब्द चपखल जुळवले तंत्रात सुध्दा बसवले

Submitted by वैवकु रीटर्न्स on 25 August, 2013 - 07:25

शेवटी माझा अहं नडलाच माजोरा मला
ना कधी आला तुझ्यावर टाकता डोरा मला

ह्या जगी त्यालाच अपुला मित्र मी मानेन , जो....
'आखरी का पेग' त्याचा पाजतो कोरा मला

पोक्तशी संवेदना बिलगायला बोलावते
घट्ट विळख्यावर म्हणे.. "निर्लज्ज तू पोरा !! " ..मला

बास कर हे रोजचे पाठीत गुद्दे घालणे
भ्याड दैवा एकदा बस येच सामोरा मला

जायचे आहे जिथेही जा चरायाला मना
कासरा सुटला तरी का ओढशी ढोरा मला

दु:ख वा आनंद असुदे थयथयाटच होतसे
शिकव ना नाचावयाला थुइथुई मोरा मला

छानसे सुविचार घेतो गोफ त्यांचा बनवतो
वाटते हल्ली अलामत रेशमी दोरा मला

शब्द चपखल जुळवले तंत्रात सुध्दा बसवले

हँडबॅग्ज, पर्सेस, बॅगपॅक्स

Submitted by शूम्पी on 23 August, 2013 - 12:44

फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १ च्या शेवटी अ‍ॅडमिन यांची सब कॅटेगरी करायची सूचना वाचली म्हणून हा वेगळा धागा काढते आहे. तिथे लिहिल्याप्रमाणे शोधायला सोपे जाइल कदाचित.

हँडबॅग्ज, पर्सेस, बॅगपॅक्स बाबतच्या गप्पा इथे मारुया (का?) . वेगळा धागा ऑलरेडी असेल तर आंगा म्हणजे हा उडवते.

पुन्हा आसाराम

Submitted by धडाकेबाज on 23 August, 2013 - 12:28

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/asaram-bapu-jodhpur-rape-p...

आसाराम हा पुन्हा विवादात फसलाय. त्याच्यावर बलात्काराचा आरोप झालाय. ह्याला पोसणाऱ्या भक्तांनी आता तर सुधारावे. हे भक्त लोकच ह्यांच्या सारख्या लबाड साधूंचे भक्ष्य ठरतायत .काय करायचे ह्या नीच भोदुंचे.

विषय: 

सोन्याचा बोरु, पितळेचे भांडे

Submitted by चिंतामण पाटील on 23 August, 2013 - 06:46

सोन्याचा बोरु, पितळेचे भांडे
दिवसभरच्या रिपरिपीनंतर पाऊस थाबंला होता. तसा गेला महिना झाला पाऊस कोकणासारखा कोसळत होता. घरी आलो तेव्हा सायंकाळ होत आलेली. ओट्यावर आई माझीच वाट बघत बसलेली. ओट्यावर चढलो तसा ती ओक्साबोक्सी रडू लागली.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर